Jalgaon News : भुसावळ तालुक्यातील 29 संशयितांना प्रवेशबंदी

crime news
crime news esakal

Jalgaon News : आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील २९ संशयितांना प्रवेशबंदी केली आहे. आगामी काळात अक्षयतृतीया, रमजान ईद, तर शुक्रवारी (ता. १३) डॉ. बाबासाहेब जयंती साजरी होणार आहेत. (Entry ban for 29 suspects from Bhusawal taluka jalgaon news)

या काळात शांतता अबाधित राहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेशाने भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर, भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या, रेकॉर्डवरील संशयिताना प्रवेशबंदी केली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime news
Jalgaon News : अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला

त्यात कृष्णा मिलिंद गायकवाड ऊर्फ शटर, शेख मोहसीन ऊर्फ बिल्लू शेख मुन्ना, सूरज अशोक भांगे, हसनअली नियजअली इराणी ऊर्फ आशू, सिद्धार्थ काशिनाथ जाधव, धीरज वसंत खंडारे, प्रेमकुमार ऊर्फ संतोष गणेश झाडे, महेंद्र रामदास कोल्हे, मयूर अरुण कोलते, अरबाज शेख शब्बीर शेख, शाहरुख युसूफ पिंजारी, नवाब लाल मोहंमद गवळी, भूषण ऊर्फ टकल्या यशवंत मोरे, नरेंद्र ऊर्फ बाळा अरुण मोरे, करण किसन इंगळे,

सौरभ ऊर्फ शिवाजी किशोर महाजन, राहुल ऊर्फ बाळा डिगंबर सोनवणे, सचिन संतोष सपकाळे, जुबेर युसूफ पटेल, किशोर उत्तम कोळी, अनसार रशीद गवळी, अशोक धनसिंग तायडे, त्याचप्रमाणे नशिराबाद पोलिस ठाण्यातील सात, असे एकूण २९ संशयितांविरुद्ध प्रस्ताव सादर केले होते.

crime news
Market Committee Election : डॉ. सतीश पाटील यांच्या अर्जांसह रेखा पाटलांचाही अर्ज अवैध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com