Jalgaon Talathi Kotwal Exam : उद्या तलाठी, कोतवाल पदांसाठी परीक्षा; परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 exam
examesakal

Jalgaon Talathi Kotwal Exam : जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी (ता. १३) पोलिसपाटील व कोतवाल रिक्त पदांसाठी जळगाव जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

सकाळी ११ ते दुपारी साडेबारा व दुपारी तीन ते चार या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. (Examination for posts of Talathi Kotwal in district on 13 august jalgaon news)

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.

परीक्षा केंद्र परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) चे मनाई आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 exam
Jalgaon News : युवकांना 10 ते 50 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार; या वेबसाइटवर करा अर्ज

केंद्राजवळच्या ५० मीटरच्या आतील परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने पेपर सुरू झालेपासून ते संपेपर्यंत बंद राहातील.

सकाळ सत्रात‌ पोलिसपाटील व दुपार सत्रात कोतवाल या पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रतिबंधात्मक आदेश परीक्षार्थी, नियुक्ती अधिकारी, कर्मचारी, पोलिस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाही, असे श्री. सुधळकर यांनी सांगितले.

 exam
Jalgaon Eye Infection : डोळ्यांच्या संसर्गजन्य रोगाचे रुग्ण वाढले; अशी घ्या काळजी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com