धरणगाव (जि. जळगाव) : तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची ६ फेब्रुवारीला घेण्यात आलेली बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. अध्यक्ष आर. डी. पाटील, सचिव मिलिंद पवार यांनी हे संयुक्त प्रसिद्धीपत्रक (Press Release) काढले आहे. (Executive of Ration Shopkeepers Association illegal jalgaon news)
या बैठकीत सदस्यांना विश्वासात न घेता खोटे आश्वासन देऊन आपल्या मर्जीतल्या लोकांची निवड करून घेण्यात आली. आगामी काळात दुकानदारांच्या समस्या व शासनाच्या धोरणाविरोधात होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
परंतु बैठकीत धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची कार्यकारिणी बदल करण्यासंबंधी कोणताच विषय नसताना सुद्धा त्यावर चर्चा घडवून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचा आरोप देखील प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. ही बैठक संघटनेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांनी बोलावली नव्हती.
कार्यकारिणीबाबत काही तक्रारी असल्यास किंवा पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ) बदलाबाबत संघटनेकडे कोणत्याही सभासदाने अगर पदाधिकारी यांनी लेखी तक्रारी केलेल्या नाहीत. ही बैठक अध्यक्ष / सचिव यांच्या स्वाक्षरीने घेतलेली नाही. बैठकीच्या अजेंडावर अध्यक्ष / सचिव यांची सही असणे ही कायदेशीर तरतूद असते.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्यामुळे इतर कुणीही बैठक बोलवत असेल तर ती सहकार कायद्यात बसत नाही. तरी नुकतीच घेण्यात आलेली बैठक ही अध्यक्ष /सचिव यांनी बोलविल्यानंतरच ग्राह्य धरण्यात येईल. तालुका संघटनेची नवीन कार्यकारिणीबाबतची बैठक ही बेकायदेशीर असून, नेमलेली कार्यकारिणी सुद्धा बेकायदेशीर आहे. या बैठकीच्या अजेंड्यावर विषय सूची नव्हती.
विषय सूचीवर कार्यकारिणी बदलाबाबत विषय ठेवण्यात आला नव्हता. यथावकाश विषय सूचीवर बदलाबाबतचा विषय ठेवण्यात येईल आणि त्यावर चर्चा होऊन अंतिम निकाल झाल्यावर नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे ६ फेब्रुवारीला घेण्यात आलेली बैठक ही बेकायदेशीर असून, निवडण्यात आलेली नवीन कार्यकारिणी ही सुद्धा बेकायदेशीर आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात अध्यक्ष आर. डी. पाटील, सचिव मिलिंद पवार यांनी म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.