कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा भारही ‘ति’च्या वरच!

पुरुषांना वाटते भीती : तीन वर्षात एकानेच केली शस्त्रक्रिया
family planning
family planningsakal

जळगाव : कुटुंबाचा गाडा चालविण्यात महिला अग्रस्थानी असतात. एव्हाना कुटुंबात काहीही आपत्ती आली तरी महिला पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून साथ देतात. घरातील सर्वाच्या भोजनानंतर त्या शेवट भोजन करतात. घरातील सर्वांच्या सुखासाठी त्या झटतात. मात्र समाजात पुरूषी वर्चस्वाची परंपरा पूर्वीपासून असल्याने कुटुंबासाठी महिलेने काहीही केले तरी तिला दुय्यम स्थान दिले जाते. कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेचही तसेच आहे. गेल्या तीन वर्षात केवळ एकाच पुरुषाने कुटुंब नियेाजनाची शस्त्रक्रिया केली आहे. महिलाच कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत अव्वल असतात, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या अहवालावरून दिसून येते.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांमध्ये असलेली भिती व उदासीनता याला कारणीभूत असल्याचे डॉक्टर व मानसिक समुपदेशकांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षात केवळ ३ पुरुषांनी कुटुंब नियेाजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. २०१९-२०२० मध्ये तर एकच पुरूषाने शस्त्रक्रिया केली. त्यामानाने यावर्षी ४४० महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतली. आता महिलांवरच कुटुंब नियोजनाची जबाबदारी टाकली जात असल्याचे चित्र आहे.

family planning
राहुल गांधींचं 'ते' वक्तव्य असमर्थनीय; अमेरिकेने मंत्रालयाने सुनावलं

पुरुषांना प्रोत्साहनपर भत्ता

कुटुंब नियेाजन शस्त्रक्रियेत महिलांच्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांची शस्त्रक्रिया सोपी असते. महिलांची ही शस्त्रक्रिया किचकट असते. शस्त्रकियेनंतर कोणतेही व्यंग येत नाही. पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली तर एक हजार रुपये प्रोत्साहनपर मिळतात. महिलेला केवळ दोनशे पन्नास रुपये मिळतात. (एस.सी, एस.टी. संवर्गातील असल्यास सहाशे). असे असूनही पुरुषांचे शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण कमी आहे. जिल्हाभरातही हेच चित्र आहे. अनेकदा जनजागृती, समुपदेशन होते.

असे आहेत गैरसमज

कुटुंब नियेाजनाची शस्त्रक्रिया केल्यास आपले पुरुषत्व धोक्यात येईल. समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आपण घरातील मुख्य व्यक्ती असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कोण करेल. या शस्त्रक्रिया महिलांनी करायच्या असतात. असे अनेक गैरसमज आहे. वास्तविक तसे नसल्याचे प्रसूती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

family planning
दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच; राज्य मंडळ ठाम

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत महिलावर बंधने नको. पती-पत्नीत जिव्हाळा असेल, ते सुशिक्षित असतील तर या शस्त्रक्रियेबाबत योग्य मार्ग काढता येतो. कोणालाही सक्ती केली जाऊ नये. - एक पुरुष

कुटुंब नियोजनाबाबत काळानुरूप अनेक साधने सध्या उपलब्ध आहे. यामुळे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे वाटत नाही. ही शस्त्रक्रिया करणे वैयक्तिक प्रश्‍न आहे.- एक पुरुष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com