esakal | मजुरांची टंचाई; सालगड्यांचा अभावामुळे शेती बटाईने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल 
sakal

बोलून बातमी शोधा

मजुरांची टंचाई; सालगड्यांचा अभावामुळे शेती बटाईने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल 

पूर्वीप्रमाणे मजूर मिळत नाहीत. सालगडी प्रकार तर बंद झाला. आता मजूर बैलगाडी, अवजारे घेऊन स्वतः ठोके-बटाईने शेती करीत आहेत.

मजुरांची टंचाई; सालगड्यांचा अभावामुळे शेती बटाईने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वावडे (ता. अमळनेर) : मागील चार-पाच वर्षांपासून पावसाची अनियमितता, मजुरांचा अभाव, सालगडी न मिळणे आदी कारणांमुळे मोठ्या शेतकऱ्यांना जमीन कसणे, उत्पन्न काढणे जिकिरीचे झाले आहे. यामुळे मोठे शेतकरी शेती बटाईने देत आहेत.

आवश्य वाचा- ना रश्शा‍चा खमंग...ना मिष्टान्नाचा मधुर सुगंध! 
 


अमळनेर तालुक्यात शेती काळी कसदार असून, कोणत्याही पिकासाठी पोषक आहे. भूगर्भात बऱ्यापैकी जलसाठा असल्याने मोठे बागायती क्षेत्र आहे. पूर्वीप्रमाणे मजूर मिळत नाहीत. सालगडी प्रकार तर बंद झाला. आता मजूर बैलगाडी, अवजारे घेऊन स्वतः ठोके-बटाईने शेती करीत आहेत. मशागतीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने अपेक्षित उत्पन्न येत नाही.

सालगडी हा प्रकार बंद

परिणामी, उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी स्थिती निर्माण होते. शेतात खराब होणारी पिके पाहून शेतकरी हताश होतो. यापेक्षा ठोके बटाईने शेत दुसऱ्याला लावून करायचे व मिळणारे उत्पन्न घ्यायचे याकडे मोठ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यांच्या घरचे मजूर आहेत, बैलजोडी आहे, त्यांना उत्पादन खर्च कमी येतो व स्वत: पिकाची जास्त काळजी घेत असल्याने उत्पन्नही भरपूर मिळते. मजुरीत काही मिळत नसल्याने ठोक्याने जमीन केली जाते. पूर्वी शेतकऱ्यांकडे दोन-तीन सालगडी राहत होते. त्यांना वर्षभराची मजुरी उन्हाळ्यात द्यायची व त्यांनी वर्षभर काम करायचे. आता सालगड्यांना कुणाच्या बंधनात राहणे पसंत नाही, म्हणून सालगडी हा प्रकारच बंद झाला आहे. 

वाचा- व्हायरस पसरतोय..बोदवड, पाचोऱ्यातही कोरोनाचा विस्‍फोट‍
 


माझ्याकडे ट्यूबवेल आहे. हत्तीचे मस्तक शेती आहे, पण अलीकडे वेळ मिळत नसल्याने माझी बरीच शेती बटाईने देतो. 
-चंद्रकांत पाटील, शेतकरी, वावडे 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image