esakal | शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ८३ टक्के मिळाले 
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ८३ टक्के मिळाले 

५४ हजार ८०२ शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी ३८ लाख ३८ हजार ५ रूपयांच्या मदतीचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान ८३ टक्के मिळाले 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः गेल्या खरीप हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीच्या नुकसान झाले होते. राज्य शासनाकडून या नुकसानीपोटी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १९ कोटी ५५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात देखील १९ कोटींच्यावर अनुदान राज्य आपत्ती निधीअंतर्गत प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्याचे ९२ टक्के वाटप झाले. दुसऱ्या टप्प्याचे देखील वितरण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचार संहितेमुळे लांबले होते. या दुसऱ्या टप्प्याचे लाभ अजूनही अनेक शेतकरी लाभार्थ्यांना झालेला नाही. हे वितरण आतापर्यत केवळ ८३ टक्के झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 

आवर्जून वाचा- जळगावात पेट्रोलचे दर पाहिलेत का?; शतकाला अवघा दीड रूपया बाकी 
 

गतवर्षी (२०२०) च्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत अतीपाउस तसेच वादळ वाऱ्यांमुळे तर काही ठिकाणी पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात पंचनामे व नुकसानीच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत ३७ कोटी ६० लाख १८हजार रुपये दोन टप्पे जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यात ५४ हजार ८०२ शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी ३८ लाख ३८ हजार ५ रूपयांच्या मदतीचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. या मदत वाटपाचे प्रमाण सुमारे ८३.४६ टक्के असून उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत वर्ग करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे