esakal | कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्यांने एकरी चार लाखाचे मिळवीले उत्पन्न  
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्यांने एकरी चार लाखाचे मिळवीले उत्पन्न  

शहापूर, जामनेर : देशभरात कोरोनाचे सावट असल्याने शेतमालासह सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे मात्र अशाही स्थितीत येथील शेतकरी दत्तात्रय सननसे यांनी एकरी चार लाख रुपये भरीताच्या वांग्याचे उत्पन्न घेतले आहे.

कोरोना संकटातही शहापूरच्या शेतकऱ्यांने एकरी चार लाखाचे मिळवीले उत्पन्न  

sakal_logo
By
वासुदेव चव्हाण

शहापूर, जामनेर : देशभरात कोरोनाचे सावट असल्याने शेतमालासह सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे मात्र अशाही स्थितीत येथील शेतकरी दत्तात्रय सननसे यांनी एकरी चार लाख रुपये भरीताच्या वांग्याचे उत्पन्न घेतले आहे.

आवश्य वाचा- शहादा परिसरात भुकंपाचा धक्का; मध्यप्रदेशात केंद्र


श्री सननसे तीन वर्षांपासून भरीताच्या वांग्याची लागवड करतात या वर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रावर पाच बाय पाच फूट अंतरावर दोन हजार भरीताच्या वांग्याची रोपे लावली होती लागवडीसाठी बामनोद येथील रमेश फेंगडे यांचेकडून तीन वर्षांपूर्वी आणलेल्या घरगुती बियाण्यातून रोपे तयार करून लागवड करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत तीन लाख पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून अजून पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल या एक एकरावर शेवटपर्यंत नव्वद हजार रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले


कृषीचे वृत्तपत्र वाचून मिळाली प्रेरणा
 

कृषीविषय वृत्तपत्रात कृषीविषयक लेख, प्रगतिशील शेतकऱ्याच्या मुलाखती वाचून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी आय टी आय वीज तांत्रिक कोर्स केला असून त्यांच्या पत्नी सुशिक्षित आहे तर मुलगा शुभम कृषी पदवीधर आहे.

वाचा- पशुधनाच्या चाऱ्याला लागली अचानक आग, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान 

एका महिन्यातच दोन लाख उत्पन्न 

तेरा जुलैला लागवड केल्यामुळे नवरात्रीपासून माल सुरु होऊन दिवाळीपर्यंत चाळीस ते पस्तीस रुपये किलो भाव मिळाला या एक महिन्यात चांगला भाव मिळाल्याने एक महिन्यातच दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते दरवर्षी वांग्याची क्वालिटी चांगली असल्याने भुसावळ परिसरातून वांग्यास मोठी मागणी असते
 

संपादन- भूषण श्रीखंडे