कर्जबाजारी शेतकऱ्याची चोरवड येथे आत्महत्या | Jalgaon News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer sucide

कर्जबाजारी शेतकऱ्याची चोरवड येथे आत्महत्या

पारोळा : चोरवड (ता. पारोळा) येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. (farmer commits suicide by poison at Chorwad)

हेही वाचा: Jalgaon : रोटाव्हेटरमध्ये जखमी शेतमजुराचा मृत्यू

चोरवड येथील सुनील विठ्ठल पाटील यांनी पारोळा पोलिसात माहिती दिली, की वडील विठ्ठल वीरभान पाटील (६५) हे १८ जूनला दुपारी अडीचच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराचे कामकाज आटोपून काहीएक न सांगता शेतात निघून गेले. काही वेळानंतर मी कर्जाला कंटाळून विषारी पदार्थाचे सेवन केले आहे, असा घरी फोन आल्यानंतर नीळकंठ पाटील, समाधान पाटील हे रवाना झाले. शेतात जाऊन बघितले असता विठ्ठल पाटील यांच्या नाका-तोंडातून विषारी पदार्थ सेवन केल्याने फेस व वास येत होता. त्यानंतर आम्ही त्यांना खासगी वाहनाने कुटीर रुग्णालय पारोळा येथे घेऊन आलो. पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविले असता रविवारी (ता. २६) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Jalgaon : जुन्या वादातून मुलास बेदम मारहाण

Web Title: Farmer Committed Suicide By Poison In Chorwad Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top