स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वता:ला जमीनीत गाडून केले आत्मक्लेश आंदोलन

संजय पाटील
Saturday, 23 January 2021

शेतकर्यांनी याबाबत विजवितरण कंपनीकडे मागणी करुन देखील ते मिळत नसल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आत्मक्लेश आंदोलन करुन लक्ष वेधले.

पारोळा : मौजे हिरापूर ता. पारोळा येथील रोहीत्र गेल्या 10 दिवसापासुन जळाल्याने शेतकर्यांचा रब्बी हंगाम वाया जाण्याची भिती असुन विजवितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करित असुन शेतकर्यांना तात्काळ रोहीत्र बसवुन मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी गावात आत्मक्लेश आंदोलन करुन रोहीत्राची मागणी केली आहे.

आवर्जून वाचा- बँकेतुन कुठल्याही प्रकारची रोकड चोरी गेलेली नसली तरी सुमारे 20 हजार रूपयांचे नुकसान झाले 
 

परिसरातील शेतकर्यांच्या विविध अडचणी व समस्यांचे निराकरण करणेकामी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच रस्त्यावर उतरेल अशी भुमिका जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील यांनी बोलतांना व्यक्त केली आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बी हंगाम चांगला येईल या आशेने शेतकर्यांनी मशागतीतुन रब्बी पिकांची लागवड केली.मात्र पिकांना विजेअभावी पाणी मिळत नसल्याने पिके जळु लागली असुन रोहीत्र नादुरुस्त असल्याने शेतकर्यांनी याबाबत विजवितरण कंपनीकडे मागणी करुन देखील ते मिळत नसल्याने अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आत्मक्लेश आंदोलन करुन लक्ष वेधत तात्काळ रोहीत्र मिळण्याची मागणी केली आहे.

जवळजवळ दहा दिवस रोहित्र जळून सुद्धा तरी शेतकऱ्यांना रोहित्र मिळत नाही. रोहित्रा ची मागणी केल्यावर आधी 80% बिल भरा तरच रोहित्र मिळेल. असे उत्तर विजवितरण कंपनीच्या अधिकार्यांकडुन येत आहे.यासाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत हिरापूर येथील रोहित्र जवळ आत्मक्‍लेश आंदोलन केले. आत्मक्लेश आंदोलनाचे वेळी विठोबा पाटील. मोतीलाल पाटील. जितेंद्र पाटील. भैय्या पाटील. व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान घटनास्थळी शाखा अभियंता निसार तडवी  यांनी दोन दिवसात रोहित्र मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आवश्य वाचा- अफगाणिस्तानमध्ये घबाड सापडले आणि गुरूजी मोहात अडकले; मग काय, जे व्हायचे होते तेच झाले! 
 

तालुक्यात पहील्यांदाच आत्मक्लेश आंदोलन
तालुक्यात अनेकवेळा शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात आले.मात्र तालुक्यात प्रथमच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येवुन शेतकर्यांची बाजु मांडण्यात आल्याने संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील यांचे शेतकर्यांनी आभार मानले.
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news parola jalgaon farmers' agitation buried under ground