शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी: रावेरला मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू 

दिलीप वैद्य
Friday, 22 January 2021

साडेसातशे शेतकऱ्यांची तीन हजार ७०० ज्वारी, तर दोन हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे.

रावेर : पणन मंडळातर्फे गुरुवार पासून ज्वारी व मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. ३१ जानेवारीपर्यंत मका व ज्वारी मिळून एकूण आठ दिवसांत सहा हजार क्विंटल धान्य खरेदी करण्याचे उद्दिष्ट येथील खरेदी- विक्री संघाला दिले आहे. 

आवश्य वाचा- विकासात भर घालणारी ठोस कामे हवीत !
 

या वर्षी ज्वारी व मका विक्रीसाठी सुमारे १२०० शेतकऱ्यांनी खरेदी- विक्री संघात ऑनलाइन नोंदणी केली होती. डिसेंबरअखेर शेतकऱ्यांचा पाच हजार ५३२ मका व चार हजार ३०८.५० ज्वारी क्विंटल खरेदी करण्यात आली होती. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे शासनाने खरेदी केंद्र बंद केले होते. यामुळे सुमारे साडेसातशे शेतकऱ्यांचा मका व ज्वारी खरेदीअभावी घरात पडून होती. यासंदर्भात शासनाने ज्वारी व मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. या पाठपुराव्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा येथील खरेदी-विक्री संघाला पत्र पाठवून गुरुवारपासून ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली. ३१ जानेवारीपर्यंत सुमारे साडेसातशे शेतकऱ्यांची तीन हजार ७०० ज्वारी, तर दोन हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. दोन सुट्या असल्यामुळे आठ दिवसांत शेतकऱ्यांचे सुमारे सहा हजार क्विंटल ज्वारी व मका खरेदी करण्याचे आव्हान खरेदी विक्री संघापुढे आहे. 

वाचा- शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ‘टी’ आकारालाच मंजुरी !
 

अधिकाऱ्यांची भेट 
गुरुवारी दुपारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी जी. एन. मगरे यांनी खरेदी- विक्री संघ व ज्वारी, मका खरेदी केंद्राला भेट दिली व समाधान व्यक्त केले. या वेळी लिपिक श्री. घाटी, खरेदी- विक्री संघाचे उपाध्यक्ष किशोर पाटील, ग्रेडर प्रशांत पाटील, महसूलचे योगेश मोहिते आदी उपस्थित होते.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer marathi news raver good news farmer maize sorghum shopping center started