महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप

आमदार सावकारे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप
महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संतापsakal
Updated on

भुसावळ : तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणतर्फे अवाजवी वीज बिले आकारण्यात येत असून दोन- दोन महिने वीज डीपीची दुरुस्ती करण्यात येत नाही. तसेच मीटर रीडिंगनुसार वीज बिले न आकारता अवास्तव बिले आकारून शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना आमदार संजय सावकारे यांच्याकडे मांडल्या असता आमदार सावकारे यांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून कार्यकारी अभियंता घारुडे तसेच श्री. धांडे व श्री. भंगाळे या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप
बाबा रामदेव अडचणीत! अॅलोपॅथी विरोधातील वक्तव्य भोवणार

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच त्यांना महावितरणतर्फे होत असलेल्या त्रासाबद्दल आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने नैसर्गिक कारणांनी किंवा चोऱ्यांमुळे बंद पडलेल्या वीज डीपीची दुरुस्ती करावी. नादुरुस्त मीटर बदलून सरासरी बिले न देता रीडिंगनुसारच वीज बिल मिळावे. डीपी बंद असतानासुद्धा शेतकऱ्यांना दिलेली बिले रद्द करण्याची मागणी आमदार संजय सावकारे व उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, साकेगावचे माजी सरपंच अनिल पाटील, किसान मोर्चाचे कैलास झोपे, संजय पाटील व शेतकरी उपस्थित होते.

"एकीकडे अतिवृष्टीमुळे महाविकास आघाडी शासन म्हणते की, आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नाही आणि दुसरीकडे त्यांच्याच महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी व भरमसाठ बिले आकारून वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. अस्मानी संकटामुळे परेशान असलेल्या शेतकरी बांधवावर होत असलेला कोणताही अन्याय कदापि सहन करण्यात येणार नाही."

- संजय सावकारे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon railway flyover latest update
Israeli Farming Techniques Empower Women Farmers in Maharashtra's Varakhedi Village
Tension in Pimpalner as Maternal Death Leads to Protest Against Doctors
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Marathi News Esakal
www.esakal.com