
सावदा : शहरातील काजीपुरा भागातील सार्वजनिक शौचालयाजवळ नाल्यावर तडवी वाड्यातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून लोखंडी रॉड, लाकडी बॅट, लाठ्याकाठ्या, दगडविटांनी हल्ला करून जखमी केले.(fight between 2 groups in Savda case has been filed against them jalgaon latest news)
याप्रकरणी अमीर रमजान तडवी याच्या फिर्यादीवरून सुलतान तडवी, अमीन तडवी, शाहरुख तडवी, राजू तडवी, नबाव तडवी, समीर तडवी, रहेमान तडवी, जमीर तडवी, शेखर तडवी, अरबाज तडवी, मोईन तडवी, आसिफ तडवी, जुबेर तडवी आदींसह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर नवाब उस्मान तडवी याच्या फिर्यादीवरून मुराद तडवी, जावेद तडवी, नवाज तडवी, सलीम तडवी, रमजान तडवी, नवाज तडवी, अमीन तडवी, सलमान तडवी, आदिल तडवी आदींसह २२ ते २५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात १८ जणांना अटक झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. डी. इंगोले व उपनिरीक्षक समाधान गायकवाड तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.