Jalgaon Crime News : निवडणुकीच्या वादातून एकाचा हवेत गोळीबार; ठार मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : निवडणुकीच्या वादातून एकाचा हवेत गोळीबार; ठार मारण्याची धमकी

जामनेर (जि. जळगाव) : सरपंच पदाच्या उमेदवाराच्या पतीस विरोधी पक्षाच्या पॅनलमधील एकाने हवेत गोळीबार करून व डोक्याला बंदूक लावून प्रचार थांबवा, अन्यथा संपेवेल, अशी धमकी दिल्याची घटना हिंगणे बुद्रुक (ता. जामनेर) येथे मंगळवारी (ता. १३) रात्री घडली. (fired in air over election dispute Threat to kill Jalgaon Crime News)

या प्रकरणी धमकी देणाऱ्यास तातडीने अटक करण्याची मागणी करत माजी सरपंचासह सरपंचपदाच्या उमेदवाराने थेट ग्रामस्थांसह जामनेर पोलिस ठाणे गाठून पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. माजी सरपंच पती अनिल राजाराम चौधरी यांना विरोधी पक्षाच्या पॅनलमधील एकाने डोक्याला रिव्हॉल्वर लावून प्रचार थांबविण्यास सांगत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.