KBCNMU : खानदेशातील भावी वकील धडकले ‘उमवि’त; जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण!

KBCNMU
KBCNMUesakal

जळगाव : जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विधी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या निम्मेहून अधिक विद्यार्थ्यांनी नुकताच लागेल्या परीक्षा निकालावर आक्षेप घेतला.

बहुतांश विद्यार्थी काही विषयांमध्ये आश्‍यर्यकारक नापास झाले असून, त्यांनी या निकालावर आक्षेप घेत उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसह पुनर्विलोकनाची (Revision) मागणी केली. (for various demands related to exam Future lawyers come to kbcnmu umvi jalgaon news )

कोरोनानंतर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच विद्या शाखांतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी लेखी परीक्षा झाल्या. विधी विद्याशाखेंतर्गत डिसेंबरमध्ये डिस्क्रीप्टीव (लेखी) पद्धतीच्या परीक्षा झाल्या.

निम्म्याहून अधिक नापास

या परीक्षांचा निकाल नुकताच विद्यापीठाने जाहीर केला असून, निम्मेपेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले, तर, उर्वरितांना काठावर समाधान मानावे लागले. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या पद्धतीने विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी दीर्घोत्तरी स्वरूपात प्रश्नोत्तर लिखाण केल्याने मिळालेले गुण अपेक्षेपेक्षा खूप कमी आहेत.

तसेच दोन विषयांपेक्षा जास्त विषयात पुर्नविलोकन करणे अशक्य असल्याने विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी सम्राट सोनवणे, ॲड. कुणाल पवार, सिनेट सदस्य अमोल पाटील, अमोल सोनवणे, अमोल मराठे, पवन पाटील, विक्रम आशोक सोनवणे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

KBCNMU
Employee Strike : जिल्‍हा परिषद कर्मचाऱ्यांचा मूक मोर्चा; एकच मिशन जुनी पेन्शन!

अशा आहेत मागण्या

-विद्यापीठाच्या निर्देशित पद्धतीने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून निकालावर शंका उपस्थित होण्यास वाव आहे, तरी विद्यापीठाने विधी शाखेच्या निकालाचे पुनर्विलोकन करावे

-पेपर तपासणीसाठी विद्यार्थ्यांकडून आकारली जाणारे शुल्क खूप जास्त असून, ते परवडेल अशा स्वरूपात घ्यावे

-परीक्षा ऑफलाईन आणि उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ऑलाईन तपासणीचा वापरलेले दंडक अयोग्य

-विद्यापीठास ऑनलाईन परीक्षा घ्यायची होती, तर उत्तरपत्रिका तपासताना तांत्रिक (ऑनलाईन) पद्धतीचा वापर नको, अन्यथा ऑनलाईन पुन्हा परीक्षा घ्यावी.

-परीक्षांमधील मॉडेल उत्तरपत्रिका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना द्यावी

-६०-४० पॅटर्न वापरा

या महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय (धुळे), एस. एम. बियाणी विधी महाविद्यालय (धुळे), एनटीव्हीएस विधी महाविद्यालय (धुळे), एनटीव्हीएस विधी महाविद्यालय (नंदुरबार), जमिया विधी महाविद्यालय (अक्कलकुवा).

२०११चा प्रकार

२०११ मध्ये कुलगुरू डॉ. के. बी पाटील असताना, अशाच पद्धतीने पेपर तपासणीत घोळ आढळला होता. त्यावेळी २५ पैकी २४ विद्यार्थी पुर्नतपासणीत उत्तीर्ण झाले होते. तसाच हा प्रकार असल्याचे ॲड. कुणाल पावर यांनी सांगितले.

KBCNMU
Jalgaon News : मनपाचे अंगकाढू धोरण; आयुक्त मॅडम, रस्त्यांवरील खोदकामांना ‘फुलस्टॉप’ कधी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com