ऑनलाइन व्यवसायाचे आमिष महागात; रक्कम बँकेत जमा होताच मारला डल्ला

पोलिसात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Case News
Fraud Case News esakal
Updated on

जळगाव : शिवाजीनगर भागात वास्तव्यास असलेल्या महिलेला ऑनलाइन व्यवसायाचे फायदे सांगत पैसा कमावून देण्याचे आमिष देत, चौघा संशयितांनी ३ लाखांचा गंडा घातला आहे. शहर पोलिसात चारही गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर भागातील खडकेचाळ भागात वैशाली बाविस्कर या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. १ ते ३० मे दरम्यान, त्यांना राहुल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी शिंपी अशा चार जणांनी ऑनलाइन व्यवसाय करण्याचे सांगत त्यातून जास्तीचा फायदा होईल, असे आमिष दाखविले. या ऑनलाइन व्यवसायासाठी कर्ज काढण्यास भाग पाडून फिर्यादीचे स्टेट बँकेच्या खात्यावरुन रक्कम एचडीएफसी बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन मिटींग घेत वैशाली बाविस्कर यांच्याकडून ओटीपी क्रमांक मिळवला. या क्रमांकाच्या आधारावर वैशाली बाविस्कर यांच्या खात्यातून २ लाख ६१ हजार व २७ हजार ६०८ व ११ हजार ६६४ असे एकूण ३ लाख २८१ रुपये परस्पर काढून घेतले.

Fraud Case News
खासदारांच्या गद्दारीची परतफेड करू : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विचारणा केल्यावर शिवीगाळ

फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर वैशाली बाविस्कर या संबंधितांकडे याबाबत विचारणा करण्यास गेल्या असता, महेश शिंपी व पल्लवी शिंपी या दाम्पत्याने वैशाली बाविस्कर यांना शिवीगाळ करत मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली. महिनाभर झालेल्या या प्रकाराबाबत अखेर वैशाली बाविस्कर यांनी बुधवारी (ता. १) शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन राहुल अग्रवाल, तुषार इंगळे, महेश शिंपी व पल्लवी महेश शिंपी दोन्ही (रा. पंचमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे, तिसरी गल्ली, जळगाव) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार रवींद्र सोनार करीत आहेत.

Fraud Case News
Jalgaon : गळ्यावर विळ्याने वार; पिंप्री येथील वृद्धेची हत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com