चहा व्यवसायाच्या नावाने फसवणूक करणारा अटकेत | jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrest

चहा व्यवसायाच्या नावाने फसवणूक करणारा अटकेत

जळगाव : चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली एकाला ३ लाखाची फसवणूक करणाऱ्या संशयिताला गुवाहटी येथून सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पप्पू खान पीर खान उर्फ साबीर खान उर्फ तौसिफ खान (मूळ रा. राजस्थान, ह. मु. गुवाहाटी, आसाम) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा: आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड, 12 जणांविरुद्ध गुन्हा

शहरातील शेराचौकातील शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन (वय ४८) याने फेसबुकवर पीअरल टी कॉफी शॉप नावाच्या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून तरुणाला चहाचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली शेख अहमद यांची ३ लाख ८०५ रुपयात ऑनलाइन गंडवले होते. तसेच, चहाची ऑर्डरसह फोन-पे यासह ऑनलाइन पद्धतीने ॲडव्हान्स रक्कम घेऊन त्यांनी चहाचा माल पाठविला नव्हता. फसवणूक झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार साबीर खान, पप्पू खान, तौसिफ खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अन्‌ संशयित अटकेत

सायबर पोलिसांनी शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांनी पैसे पाठविलेल्या बँक खाते व संपर्क केलेल्या मोबाईलची संपूर्ण माहिती काढली. त्या माहितीचे पोलिस नाइक दिलीप चिंचोले, गौरव पाटील, दीपक सोनवणे यांनी तांत्रिक विश्‍लेषण करून संशयिताला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

हेही वाचा: १४० कोटींची बनावट बिले

Web Title: Fraud Rs 3 Lakh Suspect Arrested By Cyber Police From Guwahati Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..