
जळगाव : पॅरोलवर सुटलेल्या फरारी आरोपीला अटक
जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ‘कोविड-१९’ अभिवचन रजेवर जेलमधून बाहेर आलेल्या फरारी बंदिवानास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वसंत उर्फ जयकुमार ढोमन अहिरे (रा. भोईवाडा, अमळनेर) असे अटक करण्यात आलेल्या बंदीचे नाव आहे.
हेही वाचा: जेवण न बनविल्याच्या रागातून पतीने पत्नीला पाठविले यमसदनी
अमळनेर पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात अमळनेर सत्र न्यायालयाने वसंत अहिरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना अहिरे यांना ५ जून २०२२ पर्यंत कोविड १९ अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र मुदत उलटून गेली तरी ते कारगृहात हजर झाले नाही. फरार बंदिवान आरोपी वसंत अहिरे त्यांचे गावी अमळनेर येथे असल्याची गुप्त माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील संदीप रमेश पाटील, प्रविण मांडोळे यांना रवाना करण्यात आले. त्यांना अमळनेर येथून अटक करुन संशयिताला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा: खड्डे आणि खड्डेच, रस्ताच गायब! कोटींचा निधी मंजूर, मग काम का थांबले?
Web Title: Fugitive Accused Arrested On Parole N Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..