Jalgaon Crime News : सट्टा जुगारावर अप्पर अधीक्षक Action मोडवर

Jalgaon Crime News
Jalgaon Crime Newsesakal

जळगाव : शहरातील बी. जे. मार्केटमध्ये सट्टा जुगाराचा बाजार मांडल्याचा व्हिडीओ आरटीआय कार्यकर्त्याने व्हायरल केल्यानंतर अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने कारवाई करून दोन गुन्हे दाखल केले आहेत.

सोशल मीडियावर ‘सट्टा जुगारासह सोरट’, अशा अवैध धंद्याचे चित्रीकरण व्हायरल झाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी उपनिरीक्षक सुनील चौधरी, चंद्रकांत पाटील, अजय पाटील, गणेश पाटील, राहुल पाटील यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. (Gambling Speculation Criminal is on Action of police Jalgaon Crime News)

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Jalgaon Crime News
Nashik News : पोषण आहार अनुदान वाढले; आमचे कधी ?

नंतर पथकाने रेडक्रॉस सोसायटीसमोर छापा टाकून निजामोद्दीन रफियोद्दीन शेख (वय ५२), पिंटू राजपूत (काळेनगर) यांना ताब्यात घेतले. सोरट खेळविणारा निजामोद्दीन याच्याकडून एक हजार ६९० रुपयांची रोकड मिळून आली.

याबाबत राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात मनोज विजय अहिरे (वय २९, रेणुकामाता मंदिर, मनपा क्वॉटर्स), जुगार अड्ड्याचा मालक पिंटू राजपूत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून एक हजार ५० रुपयांची रोकड मिळून आली. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

ट्रॅफिक गार्डनमध्ये कारवाई

‘सकाळ’मध्ये सट्टा-जुगाराचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अप्पर अधीक्षकांच्या पक्षकाने धाव घेतली. मात्र, सट्ट्याच्या अड्डाचालकाने पळ काढला. तेथील अडोशा हटविला असून, तेथे आणखी एक अवैध धंदा मिळून आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Jalgaon Crime News
Balasaheb Thorat Statement : आत्मविश्वास डगमगला की ज्योतिष आठवतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com