Jalgaon Crime News : दरोड्याच्या प्रयत्नातील टोळीचा पर्दाफाश; 74 हजारांचा मुद्देमाल जप्त

crime
crimeesakal

Jalgaon Crime News : शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पिंपळकोठा येथील सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. (Gang busted in robbery attempt 74 thousand worth of goods seized Jalgaon Crime News)

crime
Crime news : उद्योजकाच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न फसला, रिक्षाचालकाला चोप

११ ला पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलिस कर्मचारी संजय पाटील, अरुण बागूल, योगेश पाटील, शेखर साळुंखे, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे हे मोटरसायकलने गस्त घालत असताना धुळे रोडवर बलराम हॉटेलजवळ कोपऱ्यात पाच ते सहा जण मोटरसायकलींसह संशयास्पद बसलेले आढळून आले.

पोलिसांना संशय येताच ते त्यांच्या दिशेने विचारपूससाठी जाऊ लागताच सर्व जण पळू लागले. पोलिसांनी जगदीश पुंडलिक पाटील (वय २१, रा. पिंपळकोठा, ता. पारोळा) याला त्याच्या मोटरसायकलीसह अटक केली.

त्याच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर चिखल लावलेला आढळून आला. त्याच्याजवळील पिशवी तपासली असता त्यात दोन चाकू, मिरचीची पूड, नायलॉन दोरीचे बंडल, गाडीला लोखंडी टॅमी, असे दरोड्याचे साहित्य आढळून आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

crime
Crime news : १२ वर्षीय मुलीवर गणित शिक्षकाचा अत्याचार

आरोपी जगदीश याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदार दिनेश भोई, प्रेम पाटील, अजय अंबे (तिन्ही रा. पिंपळकोठा) तर करडोणे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मुंबई), भटू दिलीप पाटील (रा. पैलाड, अमळनेर) यांच्यासह दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले.

इतर आरोपी मोटरसायकलने पळून गेले होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या आदेशाने आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फरार आरोपी सापडू शकले नाहीत. पोलिसांनी मोटरसायकल (क्रमांक : एमएच १९, ईबी ९६३) तसेच दरोड्याचे साहित्य, दोन मोबाईल असा एकूण ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख तपास करीत आहेत.

crime
Jalgaon Crime News : जुगार अड्ड्यावर छापा; 8 अटकेत, पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com