Jalgaon Crime: श्री शिवमहापुराण कथास्थळी चोरीप्रकरणी राजस्थानातील महिलांच्या टोळीला अटक

gang of women from Rajasthan arrested in connection with theft of Shiv Mahapuran Katha Sthal jalgaon news
gang of women from Rajasthan arrested in connection with theft of Shiv Mahapuran Katha Sthal jalgaon news
Updated on

Jalgaon Crime: वडनगरी फाटा (ता. जळगाव) जवळील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता. ५)महिलांचे मंगळसूत्र चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन राज्यांत धुमाकूळ घालणाऱ्या मध्य प्रदेशातील संशयित २७ महिलांच्या टोळीला अटक केली होती. (gang of women from Rajasthan arrested in connection with theft of Shiv Mahapuran Katha Sthal jalgaon news)

पोलिस तपासात मध्य प्रदेशातील टोळीने गुरुवारी (ता. ७) राजस्थानच्या टोळीचा खुलासा केल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानच्या टोळीतील दहा महिलांना संशयित म्हणून अटक केली.

राजस्थानमधील टोळीतील महिलांना न्यायालयाने पोलिस कोठडीचे आदेश दिले. गर्दीच्या ठिकाणी चोरीसाठी आलेल्या टोळ्यांमधील ३७ महिलांना संशयित म्हणून अटक करण्याची देशातील ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जळगाव पोलिसांनी टोळीच्या माहितीसाठी विविध राज्यांतील पोलिसांशी संपर्क साधला आहे.

gang of women from Rajasthan arrested in connection with theft of Shiv Mahapuran Katha Sthal jalgaon news
Nashik Crime: शिवमहापुराण कथेत चोरट्यांनी साधली पर्वणी; 15 महिलांच्या पोती लंपास

यापूर्वी धुळे, मालेगाव, नाशिकसह मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशात संशयित महिलांच्या टोळीने अशाच पद्धतीने चोऱ्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पंडित मिश्रा यांच्या यापूर्वी झालेल्या कथेच्या ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

अशा ठिकाणच्या पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून अटकेतील महिलांबाबत माहिती मागितली आहे. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी चोरी झाली, तेथे टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने जळगाव पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

gang of women from Rajasthan arrested in connection with theft of Shiv Mahapuran Katha Sthal jalgaon news
Jalgaon Crime: शिवमहापुराण कथास्थळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय; पोलिस बंदोबस्तात मंगळसुत्रांसह पर्स लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com