रिक्षा प्रवाशांना लुटणारी टोळी जळगावात जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

रिक्षा प्रवाशांना लुटणारी टोळी जळगावात जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : रिक्षातील प्रवाशांना लुटणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील शिरसोली नाका परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Latest marathi news)

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रिक्षात प्रवाशांना बसवून त्यांना लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. या गुन्ह्यातील आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार मासीन उर्फ शेमड्या पठाण व इतर साथीदार यांनी चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, सुनील दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार यांचे पथक तयार करून सापळा रचला.

हेही वाचा: Jalgaon | क्षुल्लक कारणावरून पत्नीकडून पतीला बेदम मारहाण

त्याद्वारे डी-मार्ट परिसरातून संशयित आरोपी मोसीन खान उर्फ शेमड्या नुरखान पठाण (वय २८, रा. पिंप्राळा हुडको), अरशद शेख हमीद शेख (वय २३), शेख फिरोज शेख करीम (वय ३०) आणि मनोज विजय अहिरे (वय ३१, तिघे रा. गेंदालाल मिल), जळगाव यांना रिक्षासह ताब्यात घेतले. चौघांनी यावल आणि पारोळा येथील गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

हेही वाचा: ना कुठे प्रतिबंधित क्षेत्र.. ना कसले विलगीकरण! आता निर्बंधांची मानसिकताच नाही

Web Title: Gang Robbing Rickshaw Passengers Arrested In Jalgaon Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonpoliceArrest