
दुरुस्तीच्या दुचाकींच्या सुट्या भागांची विक्री; गॅरेजचालकाचा 6 जणांना चुना
जळगाव : गॅरेजवर टाकलेल्या दुचाकीचे स्पेअर पार्ट काढून वाहनाधारकांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या एकावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परेश सोपान ढगे (वय २२, रा. वाघळी, ता. चाळीसगाव) शेती करून उदरनिर्वाह करतो. शेतीकामासाठी त्याच्याकडे (एमएच १९, डीएल ७३९०) दुचाकी आहे. १५ नोव्हेंबर २०२१ ला दुचाकीमध्ये बिघाड झाल्याने परेश ढगे याने दुचाकी दुरुस्ती करण्यासाठी जळगावातील प्रेमनगरातील डी.सी. बाईक केअर गॅरेजमधील धीरज अनिल चव्हाण यांच्याकडे दिली होती. दुचाकी दुरुस्तीसाठी परेशने ३ हजार रूपये ऑनलाईन दिले होते. वारंवार दुचाकीबद्दल विचारणा केल्यानंतर धीरज उडवाउडवीची उत्तरे देत होता. रविवारी (ता. ३) परेश त्याचा मामायासोबत गॅरेजवर आला. त्यावेळी त्याच्या दुचाकीचे स्पेअर पार्टस वेगवेगळे दिसून आले, तर महत्त्वाचे पार्ट्स गायब होते. याबाबत धीरज चव्हाण याला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परेशने अधिक चौकशी केली असता, त्याच्यासारखे इतर पाच जणांचीही फसवणूक केल्याचे समोर आले.
हेही वाचा: जळगाव : पिस्तुलधारी तरुणाला पोलिसांकडून अटक
यात राजेंद्र शेषेराव जोगदंड (रा. नेहरूनगर, जळगाव) यांचे रिपेअरिंगसाठी दिलेले ३० हजार आणि ७० हजारांची दुचाकी (एमएच ०१, बीसी ७२०६), जयेश राकेश लढ्ढा (रा. लक्ष्मीनगर, जळगाव) यांनी रिपेअरिंगसाठी दिलेले ३० हजार, ७० हजारांची दुचाकी (एमएच १५ डीवाय ०६७०), विशाल अशोक जगदाडे (रा. सराफ बाजार, जळगाव) यांची ८० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १९, सीके ०००२), अनिल एकनाथ कोळी (रा. निमखेडी, जळगाव) यांची ६० हजारांची दुचाकी (एमएच ०३ बीजी ६९९९) आणि रिपेअरिंरगसाठी दिलेले १८ हजार रुपये, अशाप्रकार पाच जणांकडून ४ लाख ६३ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धीरज अनिल चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार विजयकुमार सोनार तपास करीत आहेत.
हेही वाचा: जळगाव : ‘गोल्डनमॅन’ बनण्याची वाढली ‘क्रेझ’
Web Title: Garage Mechanic Cheating With Customers In Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..