Gas Cylinder Thief arrested
sakal
जळगाव - शहर व परिसरात गॅस एजन्सींचे गुदाम फोडून सिलिंडर चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला. फैजपूर व वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करीत पोलिसांनी बुधवारी (ता. २९) तीन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.