
जळगाव : धरणगाव पंचायत समितीत गुरुवार (ता.२५) रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आढावा सभा घेतली. यात स्वच्छ भारत मिशन आणि घरकुल योजनेत कमी काम आढळून आलेल्या बोरगाव व वाघळूद येथील ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. (Gharkul scheme lacked work 2 gram sevaks suspended Jalgaon latest marathi news)
धरणगाव येथे जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा सभेत उपस्थित झालेले मुद्दे व दप्तरात आढळून आलेल्या दिरंगाईमुळे आर. डी. पवार व बी. डी. बागूल या दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
१७ ग्रामपंचायतींची सखोल तपासणीचे आदेश
धरणगाव तालुक्यातील नांदेड, जाबोरे, रेल, सोनवद, चालखेडा, दोनगाव, वराड येथील येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश डॉ. आशिया यांनी दिलेत. तसेच जळगाव तालुक्यातील उमाळे, पाथरी, शेळगाव, कुसुंबा, वावडदे, वडली, सुभाषवाडी, जवखेडे, वराड, बेडी येथील ग्रामपंचायत दप्तराची सखोल तपासणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत.