
Girish Mahajan News : खडसेंच्या स्वार्थामुळे त्यांचा जावाई तुरुंगात : गिरीश महाजन
Jalgaon News : माझ्यावर ‘मकोका’अंतर्गत खोटी कारवाई केल्याचे खुद्द खडसेंनीच मान्य केले. त्यांच्यावर मात्र कायदेशीरपणे कारवाई झाली आहे.
त्यांच्या स्वार्थमुळे त्यांचा जावाई दोन वर्षांपासून तुरुंगात असल्याची खंत मलाही आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी ‘महाजनांनी ईडी लावली म्हणून आम्ही त्यांच्यावर मोका लावला’ असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. (Girish Mahajan say Due to Khadse selfishness His son in law in jail action of Makoka is false Jalgaon News)
भाजपच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारले असते श्री. महाजन म्हणाले, खडसेंवर आम्ही कुठलाही आरोप केला नव्हता.
अंजली दमानियांच्या आरोपावर चौकशी होऊन त्यात तथ्य बाहेर आले. म्हणून त्यांच्या जावयाला तुरुंगात जावे लागले. कोर्टाने दिलासा दिला म्हणून त्यांचे कुटुंबीय बाहेर आहेत. अन्यथा तेदेखील आत असते.
माझ्याविरुद्ध ‘मकोका’ लावल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. त्यांच्यावरील कारवाई तर त्यांनी केलेल्या कृत्यामुळे होती. त्यांचा जावाई चांगला माणूस आहे, पण खडसेंच्या स्वार्थामुळे तो आत असल्याचे आम्हालाही दु:ख आहे, असा टोला महाजनांनी लगावला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मंगेश चव्हाणांकडून शेलक्या भाषेत टीका
दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांनीही आमचे नेते गिरीश महाजनांवरील टीका सहन केली जाणार नाही, असा इशारा देताना खडसेंवर शेलक्या भाषेत टीका केली. खडसे पदावर होते तेव्हा सर्वांनीच त्यांचा मान सन्मान केला.
आता मंत्री म्हणून महाजन, गुलाबराव पाटील चांगले काम करीत आहेत, तर त्यांच्यावर विनाकारण टिका करुन ते चर्चेत राहतात. खडसे ही राजकारणातील विकृती असून त्यांनी केवळ इतरांना डॉमिनेट करण्याचेच काम केले, असे चव्हाण म्हणाले.