Jalgaon News : श्वासनलिकेत उलटी अडकून बालिकेचा झोपेतच मृत्यू

Child Death
Child Deathesakal

जळगाव : शहरातील रामपेठ भागातील आठवर्षीय बालिकेला झोपेत उलटी (वांती) झाली. ती उलटी घशात अडकल्याने त्या चिमुकलीचा मृत्यू (Death) झाला. (Girl died in her sleep due to vomit stuck in the throat jalgaon news)

ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. अनुष्का मुकेश भोई (जावरे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

जुने जळगाव भागातील भोईवाड्यातील रामपेठमध्ये मुकेश एकनाथ जावरे व अलका मुकेश जावरे यांची आठ वर्षांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत वास्तव्यास आहेत. अनुष्का महापालिकेची शाळा क्रमांक तीनमध्ये ‘सीनिअर केजी’ या वर्गात शिक्षण घेत होती.

शुक्रवारी अनुष्का सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली. मात्र घरी आल्यावर अनुष्काला बरं वाटत नव्हते. तिला ताप असावा, म्हणून अनुष्काची आई अलका यांनी तिला झोपविण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान अनुष्काला दोनवेळा उलटी झाली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Child Death
Jalgaon News : अल्पवयीन मुलीशी लग्न, अत्याचारातून गर्भवती

गुळण्या करून पाणी पिल्यावर अलका यांनी अनुष्काला झोपविले. मात्र, पुन्हा अनुष्काला त्रास होऊ लागला. झोपलेली असतानाच अनुष्काला पुन्हा उलटी झाली. ही उलटी घशात अडकली. त्यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास झाला व त्यातच ती बेशुद्ध पडली. काही वेळातच अनुष्काची प्रकृती अधिकच खालावल्याने आई-वडिलांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मात्र, तोपर्यंत अनुष्काने या जगाचा निरोप घेतला होता. रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एकुलत्या एक मुलीच्या अचानकच्या अशा जाण्याने अनुष्काच्या आई-वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेने रामपेठ परिसरही सुन्न झाला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Child Death
PM Awas Yojana : घरकुलाची कामे न करणाऱ्या लाभार्थ्यांविरुद्ध धडक कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com