पाचोरा, भडगाव पालिकेत सत्तेचे गिफ्ट द्या; आमदार किशोर पाटील

मी निवडणुकीच्या वेळेस दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे
jalgaon
jalgaonsakal media

भडगावल : मी निवडणुकीच्या वेळेस दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही डोळ्यासमोर ठेवलेले व्हिजन पूर्ण करण्यासाठी वाढदिवसानिमित्त पाचोरा व भडगाव नगर परिषदेत सत्तेचे गिफ्ट मला देऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले. ते लीलावती मेडिकल फाउंडेशनतर्फे झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.

jalgaon
Oppoचा दमदार स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, फोटोज अन् फिचर्स लीक

पालकमंत्री गुलाबराव पाटील अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी आमदार दिलीप वाघ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय पवार, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती विकास पाटील, युवानेते सुमीत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, शहरप्रमुख योगेश गंजे, माजी नगराध्यक्ष सुनील देशमुख, प्रशांत पवार, शशिकांत येवले, दूध संघाच्या संचालिका डॉ. पूनम पाटील, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, बाजार समितीचे प्रशासक युवराज पाटील, डॉ. विशाल पाटील प्रमुख पाहुणे होते.

आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले, की भडगाव तालुक्यात स्वातंत्र्यनंतरही १३२ केव्ही सबस्टेशन नव्हते. त्यामुळे वीज समस्येला सामोरे जावे लागत होते. या प्रश्नावर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसलो. त्यानंतर १३२ सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली. ते सद्य:स्थितीत पूर्णत्वास आले आहे, तर वडजी, लोणपिराचे, वडधे येथे नव्याने ३३/११ केव्ही सबस्टेशन मंजूर करून ते कार्यान्वित केले. याशिवाय गुढे व वाडे येथे ३३/११ केव्ही सबस्टेशन प्रस्तावित आहे. याशिवाय गिरणा नदीवर पांढरद ते निंभोरादरम्यानचा पूल मंजूर केला. त्याचे काम सुरू आहे, तर गुढे ते नावरे, भडगावला जुना वाक रस्त्यावर पुलाचे काम मंजूर आहे. लवकरच कामे सुरू होणार आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

‘गिरणा’वर बंधारा अंतिम टप्प्यात

गिरणा नदीवर भडगाव शहरासाठी पाणी आरक्षित नव्हते. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेला अडचण येत होती. त्यामुळे जलसंपदामंत्र्यांकडून नुकतेच भडगाव शहरासाठी ३.२९ घटमीटर पाणी आरक्षित केले आहे, तर गिरणेवर बंधारा करण्यासाठी लागणारी एनओसीही प्राप्त झाली असून, पुढच्या दोन महिन्यांत भडगाव शहरासाठी बंधारा, जलशुद्धीकरण केंद्रासह ८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल, तर बहुप्रलंबित असलेल्या गिरणा नदीवरील जुने मटण मार्केट ते पेठ भागावरील पूलही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी सात कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. भडगाव शहरातील खुले भूखंड विकसित करण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

आमदारांच्या कार्याचा गौरव

दरम्यान, लीलावती मेडिकल फाउंडेशनतर्फे आमदार किशोर पाटील यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून सत्कार करण्यात आला. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोसले, डॉ. प्रकाश बच्छाव, आबा चौधरी, सौरभ बच्छाव, सचिन वाणी, शंकर मारवाडी, देवा अडिरे आदी उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पालिकांमध्ये सत्ता काबीज करू, असे सूतोवाच त्यांनी केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार यांनीही केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर आसूड ओढले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. आबा महाजन व प्रा. दीपक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापक विद्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात शहरासह तालुक्यातून आमदार पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा; केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

विकासाचे व्हिजन तयार

पाचोरा व भडगाव शहरासह तालुक्यात विकासाचा अनुशेष भरण्याचा मी प्रयत्न केला. पाचोरा शहराचा तर सर्वांगाने चेहरामोहरा बदलविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही शहरांच्या विकासाचे मोठे व्हिजन माझ्यासमोर आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. नगरविकासमंत्री शिवसेनेचे आहेत. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विकास साधायचा असेल तर मला वाढदिवसानिमित्त दोन्ही पालिकांत सत्ता गिफ्ट म्हणून द्या, असे आवाहनही आमदार किशोर पाटील यांनी या वेळी केले.

खासदारांनी एक तरी स्वच्छतागृह दाखवावे

खासदार आमच्यावर टीका करतात, पण आतापर्यंत खासदार उन्मेष पाटील यांनी निधीतून एक स्वच्छतागृह बांधलेले दाखवावे, असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. भाजपच्या आंदोलनावर ते म्हणाले, की आम्ही शेतकऱ्यांना रब्बी, अतिवृष्टीची भरपाई मिळवून आणली. तर एक चालू बिल भरल्यावर वीज न तोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे कोणत्या विषयावर त्यांनी मोर्चा काढला, हे तर मोडलेल्या लग्नाच्या पंगतीत बसण्यासारखे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com