गरजूंना शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्या : महेश ढवळे

राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे हे दोन दिवसांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Ration card
Ration cardesakal
Updated on

जळगाव : समाजातील निराधार, गरजू, वृद्ध तसेच विधवा परित्यक्ता व अपंगाचे सर्वेक्षण करून त्यांना शिधापत्रिकांचा लाभ प्राधान्याने मिळवून दिला पाहिजे. यासाठी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले.

श्री. ढवळे हे सध्या दोन दिवसांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजिंठा विश्रामगृह येथे त्यांची भेट घेऊन त्यांचा छोटेखानी स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, अमळनेर तालुकाध्यक्ष व प्रांत महिलाप्रमुख भारती अग्रवाल, जिल्हा संघटक जगन्नाथ तळेले, जिल्हा सचिव ॲड. सुभाष तायडे, महिला प्रतिनिधी प्रतिभा सूर्यवंशी, भुसावळ तालुकाध्यक्ष ॲड. कल्पना टेमानी, परिवहन समितीप्रमुख सुरेश तांबे (पाचोरा), चाळीसगाव तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे, देवेंद्र पाटील, ॲड. देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते. या प्रसंगी प्रांत महिला प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल भारती अग्रवाल यांचा तर ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष म्हणून परिवहन समितीप्रमुख सुरेश तांबे यांचा ढवळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ.अनिल देशमुख यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा संघटक जगन्नाथ तळेले यांनी आभार मानले.

Ration card
जिल्हा परिषद गट पुनर्रचना; नव्या रचनेत सर्वाधिक 9 गट चाळीसगावात
Ration card
ग. स.च्या जामीनासह विविध कर्जावरील व्याजदरात कपात : चेअरमन उदय पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com