Jalgaon News : ‘कोरोना’ लाटेच्या पार्श्वभूमीवर GMC सज्ज

Corona Wave
Corona Waveesakal

जळगाव : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर आता भारत सज्ज झाला आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना टेस्ट केली जात आहे. दुसरीकडे प्रत्येक जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देत त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार जळगाव जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालयात (जीएमसी) एका कोरोना कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सिजनयुक्त दहा खाटा या ठिकाणी आहेत. सोबतच कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती ‘जीएमसी’चे डीन डॉ. गिरीषश ठाकूर यांनी ‘सकाळ’ला दिली. (GMC is get ready in to fight the Corona wave Jalgaon News)

Corona Wave
Jalgaon News : भाजपचा महासभेत गदारोळ, निषेध ठरावाने संपले आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. २२) देशभरातील मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा प्रशासनसह आरोग्य प्रशासनाने सतर्क राहून रुग्ण आढळून आल्यास त्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

त्यासाठी प्राथमिक तयारी म्हणून कोरोना स्वतंत्र कक्षाची निर्मिती करणे, त्यात स्टाफची नियुक्ती करणे, ऑक्सिजनची व्यवस्था करणे, पीपीई किट तयार ठेवणे, पुरेसा औषधसाठा ठेवण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ‘जीएमसी’मध्ये एका कोरोना कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ऑक्सिजनयुक्त खाटा आहेत. सोबतच ऑक्सिजननिर्मिती प्लांट, ड्यूरा सिलिंडर योग्य स्थितीत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Corona Wave
Jalgaon News : अमळनेरला विभागीय स्पर्धेत 162 क्रीडापटूंचा सहभाग

लवकर निदान... लवकर उपचार

नागरिकांनी कोरोना असो वा कोणताही आजार अगोदर तपासणी करून निदान करावे, लागलीच उपचार सुरू करावे. ‘लवकर निदान... लवकर उपचार...’ या प्रणालीचा अवलंब केल्यास कोरोनापासून चार हात लांब राहू शकाल, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.

मास्क वापरा, वारंवार हात धुवा

सर्वांनीच कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेचा सामना केला आहे. यामुळे गर्दीत जाणे टाळावे, हात वारंवार धुवावेत, नाका-तोंडाला मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे. यामुळे कोरोना संसर्गाच्या विषाणूपासून दूर राहाल. शासनाने अजून या नियमांची सक्ती केलेली नाही. मात्र, आपण स्वत: काळजी घेतली, तर संसर्ग टाळता येईल, असे डीन. डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.

Corona Wave
Jalgaon News : Market Feeवरून CCIची कापूस खरेदी रखडली! शेतकऱ्यांच्या दिलाश्याला ‘ब्रेक’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com