Jalgaon News : गोद्रीची पाणी, रस्ते, आरोग्याची समस्या सुटली

Sarpanch Mangalabai Patil
Sarpanch Mangalabai Patilesakal

जळगाव : कुंभ मेळाव्यामुळे गोद्री गावात पाण्याची समस्या, वीज, शौचालय, रस्ते व आरोग्य केंद्र, अशा विविध समस्या सुटल्या आहेत.

खरेतर गोद्री गावाचा भरपूर विकास होत आहे. हिंदू समाजातील प्रमुख संतांचा पदस्पर्श आमच्या गावाला होणार आहे. त्यामुळे अविस्मरणीय असा हा सोहळा असेल, अशी भावना ग्रोदीच्या (ता. जामनेर) सरपंच मंगलाबाई भगवान पाटील यांनी व्यक्त केल्या. (Godri village water roads health problems have been solved Sarpanch Mangala Patil Say Development happened because of Kumbh Mela Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Sarpanch Mangalabai Patil
Accident News : जम्मू-काश्मीरच्या बिलावरमध्ये भीषण अपघात, 5 ठार, 15 गंभीर जखमी

गोद्री येथे २५ ते ३० जानेवारीदरम्यान हिंदू गोर बंजारा, लबाना व नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त स्थानिक ग्रामस्थ अतिशय उत्साहात कामाला लागले असून, गोद्रीसारख्या छोट्याशा गावात ऐतिहासिक भव्य दिव्य कुंभ होत असल्यामुळे चैतन्य दिसून येत आहे.

सरपंच पाटील म्हणाल्या, की या कुंभाला सर्व समाजबांधवांनी आवर्जून यावे. गोद्री येथे हिंदू गोर बंजारा, लबाना व नायकडा समाज कुंभ होत असल्याने आम्ही व सर्व ग्रामस्थ भाग्यवान आहोत. देशभरातील साधू, संत व महंत गोद्री गावात येणार आहेत.

त्यामुळे भविष्यातही हा कुंभ आमच्यासाठी प्रेरणा ठरेल. आमच्या भावी पिढ्यांसाठी याचा लाभ होईल. एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम आमच्या गावात होईल, असे कधीच आम्ही विचार केला नव्हता.

Sarpanch Mangalabai Patil
Miraj News : मिरजेतील तंतुवाद्यांचे ‘जीआय’ अंतिम टप्प्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com