Gold Rate : चोवीस दिवसांत सोने पाच हजारांनी वधारले; चांदीच्या दरामध्येही अडीच हजारांची वाढ

अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी विविध वस्तूंवर कर वाढविण्यास सुरुवात केली आहे.
Gold
Goldesakal
Updated on

जळगाव - अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी विविध वस्तूंवर कर वाढविण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून सोने, चांदीच्या भावात वाढ होत आहे. गेल्या २४ दिवसांत सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅममागे पाच हजारांची, तर चांदीच्या दरात अडीच हजारांची वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. ३) सोन्याचा भाव ८३ हजार २०० प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी), तर चांदी ९५ हजारांवर प्रतिकिलोवर पोचली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com