Jalgaon News : महापालिकेच्या 450 पदे भरतीचा मार्ग खुला; शासनातर्फे आकृतिबंधास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon municipal corporation

Jalgaon News : महापालिकेच्या 450 पदे भरतीचा मार्ग खुला; शासनातर्फे आकृतिबंधास मंजुरी

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेत (Municipal) मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे, गेल्या अनेक वर्षापासून आकृतिबंध मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. (government has approved new pattern thus paving way for recruitment of 450 posts in municipal corporation jalgaon news)

आता या नवीन आकृतिबंधास शासनाची मान्यता दिली आहे, त्यामुळे ४५० पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुरेश दामू भोळे यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ट असून सद्य:स्थितीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेच्या मंजूर आकृतिबंध व सेवा प्रवेश नियमावलीनुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच, जळगाव शहराची सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण,

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोक कल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरिकांकडून होणारी मागणी व त्याअनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी आमदार सुरेश दामू भोळे यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता. अखेर मंगळवारी (ता.१४) जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधास शासनस्तरावर

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मान्यता मिळालेली असून जळगाव शहर महानगरपालिकेत एकूण ४५० जागांची भरती प्रक्रियेसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.

१२ रोजंदारी कर्मचारी सेवेत

मनपातील शिक्षणाची अट असलेल्या बारा रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली. अनुकंपा भरतीबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले,

मनपाचा प्रलंबित अनुकंप भरतीचा मार्ग सुद्धा लवकरच पूर्ण होणार असून लेखापरीक्षण संदर्भात देखील लवकरच योग्य तो निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय नगर विकास खात्याकडून मिळाल्याचे आमदार श्री. भोळे यांनी कळविले आहे. नवीन आकृतिबंध मंजुरी तसेच, ४५० पदांच्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेमुळे जळगाव शहराच्या विकासाला गती येईल असा विश्वास आमदार श्री. भोळे यांनी व्यक्त केला.