Cotton Crop : खुल्या बाजारातून कापूस खरेदीस पणन महासंघाला शासनाची मनाई

Cotton
Cotton esakal

जळगाव : खुल्या बाजारातून (Open Market) कापूस खरेदी करण्यास मंजुरीचा प्रस्ताव पणन महासंघाने सादर केला होता. मात्र, शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने त्याला स्पष्ट नकार दिला आहे.

पणन महासंघाने अशी खरेदी करू नये, त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असेही स्पष्टपणे कळविले आहे. (Government prohibits marketing federation for buying cotton from open market jalgaon news)

राज्यात खुल्या बाजारात कापूस खरेदीस परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने शासनाकडे पाठविली होते. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितास्तव किमान हमीदराने कापूस खरेदी करून शेकऱ्यांचे चुकारे वेळेत अदा करणे,

कापूस पणन महासंघास शक्य व्हावे, यासाठी शासन हमी व दुरावा निधी उपलब्ध करून देतो, खुल्या बाजारात कापसाचे हमीदरापेक्षा दर कमी झाल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे हा हमीदरावरील कापूस खरेदीचा हेतू आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Cotton
BHR Case : फिर्यादीने ॲड.चव्हाण यांना प्रत्यक्ष रक्कम दिलीच नाही!

त्यामुळे शासनाकडून कापूस उत्पादक पणन महासंघास खुल्या बाजारभावाने कापूस खरेदीसाठी शासन हमी व दुरावा उपलब्ध करून देता येणार नाही. यास्तव कापूस पणन महासंघाने प्रस्तावित केल्यानुसार महासंघास खुल्या बाजारभावाने कापूस खरेदीच्या प्रक्रियेची व तद्‌षंगिक व्यवहाराची जबाबदारी शासन घेऊ शकत नाही.

पणन महासंघाने खुल्या बाजारातून कापूस खरेदी करू नये. त्यामुळे महासंघाचा हा प्रस्ताव नामंजूर करण्यात येत आहे, असे शासनाच्या पणन विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांनी हा आदेश जारी केला आहे.

Cotton
Jalgaon News : भुसावळला 500 किलो गांजा पकडला; LCBची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com