Jalgaon News: ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची उद्या सांगता; तालुका प्रशासनातर्फे मतपेट्या सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tehsildar Namdev Patil, Naib Tehsildar Dilip Bari etc. while inspecting the process of sealing voting machines in Gram Panchayat elections.

Jalgaon News: ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची उद्या सांगता; तालुका प्रशासनातर्फे मतपेट्या सील

जळगाव : शहरासह जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या २४ तास आधी प्रचाराची सांगता शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी होणार आहे. जळगाव तालुक्यात १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. त्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे दहा ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) मतदान होणार आहे. तहसील प्रशासनातर्फे मतदान यंत्रे सील करण्यात आली आहेत. तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Gram Panchayat election campaign to be stopped tomorrow Ballot boxes sealed by taluka administration Jalgaon News)

मतदान यंत्रात आपल्या उमेदवारांची छायाचित्रे, नाव, चिन्हे असल्याची खात्री करण्यासाठी झालेली गर्दी.

मतदान यंत्रात आपल्या उमेदवारांची छायाचित्रे, नाव, चिन्हे असल्याची खात्री करण्यासाठी झालेली गर्दी.

जळगाव तालुक्यातील उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १४) मतदान यंत्रांमध्ये संबंधित उमेदवारांची नावे, चिन्ह्यांच्या याद्या तयार करून लावण्यात आल्या. तहसीलदार नामदेव पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सील करण्यात आली. मतदानात यंत्र मते ‘निल’ असल्याचे दाखविण्यात आली. संबंधित यंत्रात त्याच ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची नावे, चिन्ह असल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले. नंतरच मतदान यंत्रे सील करण्यात आली.

तालुक्यात दहा ग्रामपंचायती मिळून ३० बूथ आहेत. एका ग्रामपंचायत स्तरावर तीन बूथ असतील. त्यावर प्रत्येकी पाच कर्मचारी, अशा दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहा टक्के कर्मचारी जादा ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Humor Therapy : तणाव घालविण्यासाठी मनापासून हसा!; हास्‍य योगाच्या सरावातून होतो फायदा!

शनिवारी कर्मचारी रवाना होणार

ग्रामपंचायत निवडणूक रविवारी (ता. १८) असल्याने शनिवारी (ता. १७) सकाळी दहाला मतदान कर्मचारी, पोलिस बंदोबस्तासह संबंधित मतदान केंद्रांवर बसने रवाना होणार आहेत. शनिवारी सकाळी मतदान कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाईल. मतदान सुरू झाल्यानंतर यंत्रात बिघाड झाल्यास पर्यायी मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत.

दोन ग्रामपंचायती बिनविरोध

सावखेडा खुर्द व सुजदे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

मतदान होणाऱ्या दहा ग्रामपंचायती

भादली खुर्द, भोलाणे, देऊळवाडे, घार्डी-अमोदा खुर्द, जळके, किनोद, कुवारखेडे, वराड खुर्द व बुद्रुक, वसंतवाडी, विदगाव

हेही वाचा: Nashik News : नगराध्यक्ष ते उपमुख्यमंत्री घडविणारी ऐतिहासिक रंगारवाडा शाळा कालबाह्य!