
मतभेद याला फाटा देत सुभाष जाधव यांच्या नेतृत्वात वसंतनगर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सुभाष जाधव व नवनियुक्त सदस्य यांनी सदिच्छा भेट घेतली.
कळमसरेः समाजप्रिय अधिकाऱ्याची गाव विकासासाठी चाललेली खटाटोप म्हणजेच ही गाव विकासासाठी गावातील परिवर्तनाची नांदी आहे.असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
आवश्य वाचा- पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा
वसंतनगर ता.पारोळा येथील ग्रामपंचायत निवडणूक स्वातंत्र्यानंतर प्रथमच बिनविरोध झाली.नेहमी मतदान आणि त्यातून होणारे मतभेद याला फाटा देत सुभाष जाधव यांच्या नेतृत्वात वसंतनगर ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सुभाष जाधव व नवनियुक्त सदस्य यांनी सदिच्छा भेट घेतली. सर्व अकरा ग्रामपंचायत सदस्य व गावातील जेष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने एकमताने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करू अशी चर्चाही करण्यात आली.
हेही वाचा- रुग्णसेवेसाठी जळगावात धावणार ‘लाइफलाइन’
गावाचा हितासाठी धोरण
ग.स.पतपेढीचे संचालक व गटविकास अधिकारी म्हणून ते एक आदर्श अधिकारी व ग.स.पतपेढीच्या तीन पंचवार्षिक निवडणूकीच्या राजकारणातून ते समाजकारणापर्यंतचा अभ्यास हा गावगाडा चालविण्यासाठी गावाच्या हितासाठी नक्कीच विकासात्मक धोरणाचा अवलंब करणारा आहे.असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी सुभाष जाधव यांना पेढा भरवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वसंतनगर सह परिसरातील शेतरस्ते, शेतीसह गावठाणसाठी सुरळीत वीजपुरवठा, गावअंतर्गत रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा योजना, भूमिगत बंदिस्त गटार, सामाजिक सभागृह आदी कामांबाबत गावासह परिसरातील विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही पालकमंत्री यांनी दिले. याप्रसंगी जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज चौधरी , नारायण सोनवणे, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य राजू जाधव, रतीलाल जाधव यांचीही उपस्थिती होती.
संपादन- भूषण श्रीखंडे