ग्रामपंचायत निवडणूकींचा प्रचारतोफा थंडावल्या !

देविदास वाणी
Wednesday, 13 January 2021

माघारीच्या दिवशी सहा हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सध्या सात हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत.

जळगाव : जिल्ह्यात येत्या शुक्रवारी (ता.१५) ७८३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या आहेत. जिल्ह्यात एकूण दोन हजार ७७४ मतदान यंत्रे निवडणूकीसाठी सील करण्यात आली आहेत. एकूण दोन हजार ४१२ मतदान केंद्रे असतील. त्यावर १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आवश्य वाचा- उसनवारीचे पैसे मिळाले; बँकेच्या अकाउंटमध्ये टाकणार तोच पैसे गायब ! 

सर्वच तहसील कार्यालयात काल ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावून यंत्रे सील करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उद्या (ता.१४) सकाळ मतदान कर्मचारी मतदान यंत्रासह पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. 
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते, तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी सहा हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सध्या सात हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत.

आवर्जून वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !
 

प्रचाराची रणधुमाळी वेगाने

सर्वच तहसील कार्यालयांनी मतदान यंत्रांत ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. 
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी गेल्या आठवडाभरापासून प्रचाराची रणधुमाळी वेगाने सुरू होती. घरोघरी माहितीपत्रके वाटण्यासह रॅली, रिक्षाद्वारे उमेदवारांचा प्रचार सुरु होता. यात विकासकामांच्या आश्वासनांची खैरात देण्यासह अनेक जाहीरनामेही देण्यात आली आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news jalgaon campaign election stopped