
यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरल्यानंतर ‘लिंग’ प्रकारापुढे ‘इतर’असे नमुद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारला गेला.
जळगाव ः भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. गेल्या १५ जानेवारीस मतदान झाले होते. आज निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. त्यात अंजली जान विजयी झाल्या. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी लोकप्रतिनिधी बनल्या आहेत.
भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील (गुरू संजना जान) यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज तहसील कार्यालयाने नाकरल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचाराला आता यश लाभले आहे.
आवर्जून वाचा- श्वानास मोठ्या शिताफीने पकडले व पाचोरापासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या लोहारा वनक्षेत्रात सोडण्यात आले.
आज सकाळी झालेल्या मतमोजणीतून वॉर्ड क्रमांक चारमधून अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. त्या जिल्ह्यातील पहिल्या लोकप्रतिनिधी बनल्या आहेत. अंजली पाटील यांचा मागील पंचवार्षिक निवडूणकीत ११ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरल्यानंतर ‘लिंग’ प्रकारापुढे ‘इतर’असे नमुद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारला गेला. खंडपिठात धाव घेतल्यानंतर स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास त्यांना परवानगी मिळाली होती. भादली ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होताना सर्वांनाच याबाबत उत्सूकता हेाती. अखेर त्या विजयी झाल्या. त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोश केला.
लोकांच्या मेहरबानीने मी निवडून आले. आता गावातील समस्या माझ्या जबाबदारीने मी सोडवेन. माझ्या उमेदवारीवर दाखविलेला विश्वास सार्थक करीन.
-अंजली पाटील (संजना जान) विजयी उमेदवार
संपादन- भूषण श्रीखंडे