जळगाव जिल्ह्यात उद्या ग्रामपंचायती निवडणूकीसाठी मतदान 

सचिन जोशी
Thursday, 14 January 2021

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, जळगाव जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींत निवडणूक होत आहे.

जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेल्या वगळता उर्वरित ६८७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होत आहे. त्यासाठी दोन हजारांहून अधिक केंद्रांवर १३ लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जवळपास पाच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त यासाठी तैनात असेल. 

आवश्य वाचा- दिवसभर शेतात पिकाला पाणी दिले; आणि सायंकाळी भयंकर असे केले

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, जळगाव जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींत निवडणूक होत आहे. त्यांपैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, ६८७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यासाठी १३ लाख चार हजार ९२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात सहा लाख २६ हजार सात महिला, तर सहा लाख ७८ हजार ९०६ पुरुष मतदार मतदान करतील. ६९७ ग्रामपंचायतींतील पाच हजार १४५ जागांसाठी एक हजार ३३३ इमारतींमध्ये दोन हजार ४१५ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 

वाचा- जळगाकरांसाठी चांगली बातमी: ४२ कोटींच्या कामांना मंजुरी, रस्त्यांच्या कामांना प्राधान्य

 

चोख पोलिस बंदोबस्त 
निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी संबंधित केंद्रांवर सुमारे पाच हजार पोलिस अधिकारी- कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात असेल. स्थानिक जिल्ह्यातील पोलिस ताफ्यासह अन्य जिल्ह्यांतूनही बंदोबस्त मागविण्यात आला आहे. 

दृष्टिक्षेपात... 
एकूण ग्रामपंचायती : ७८३ 
मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : ६८७ 
एकूण जागा : ५,१४५ 
एकूण मतदार : १३ लाख ४९२३ 
मतदान केंद्रे : २,४१५ 

असा असेल बंदोबस्त 
पोलिस उपअधीक्षक : ८ 
पोलिस निरीक्षक : १९ 
सहाय्यक निरीक्षक : ९१ 
कर्मचारी : १,६७६ 
ोहोमगार्ड : १,६०० 
एसआरपी तुकडी : ५ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news voting gram panchayat elections