esakal | Gram Panchayat Results : एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटील यांच्यात झाली काटे कि टक्कर; कोथळीमध्ये अटी-तटीच्या लढतीमध्ये खडसे परिवार पॅनल विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat results marathi news jalgaon kothami gram panchayat khadse family panel wins

यंदाच्या ग्रापमंचायत निवडणूकीत खडसें परिवार पॅनलच्या समोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे परिर्वतन पॅनल होते.

Gram Panchayat Results : एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटील यांच्यात झाली काटे कि टक्कर; कोथळीमध्ये अटी-तटीच्या लढतीमध्ये खडसे परिवार पॅनल विजयी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे गाव असलेल्या कोथळीमधील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व ‘खडसे’परिवाराच्या पॅनलची अती-तटीची लढत झाली. या लढतीत खडसे परिवार पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. 

आवश्य वाचा- गस्तीवरील पोलिसांना पाहताच संशयितांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला
 

माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे ‘कोथळी’ गाव असून या गावातील ग्रामपंचायतीवर खडसे यांचा वर्चस्व होते. यंदाच्या ग्रापमंचायत निवडणूकीत खडसें परिवार पॅनलच्या समोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे परिर्वतन पॅनल होते. त्यामुळे  कोथळी ग्रामपंचायत निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

खडसे परिवार पॅनल

एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्या ॲड.रोहिणी खडसे यांनी भारतीय जनता पक्षातून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’मध्ये प्रवेश केला, मात्र खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे भारतीय जनता पक्षात आहेत. यावेळी खडसे प्रणित भाजप पॅनल न करता खडसे परिवारात माननाऱ्या उमेदवारांचे पॅनल करण्यात आले होते.

परिवर्तन पॅनलेने दिली टक्कर

मुक्ताईनगरात एकनाथ खडसे यांचे विरोधक म्हणून आमदार चंद्रकांत पाटील असून ग्रामंपाचतीच्या निवडणूकीत देखील आमदार चंद्रकांत पाटील यांचे परिवर्तन पॅनल उभे होते. त्यात मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती.

आवश्य वाचा- श्वानास मोठ्या शिताफीने पकडले व पाचोरापासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या लोहारा वनक्षेत्रात सोडण्यात आले. 
 

सहा जागा मिळवून खडसे पॅनल विजयी 
कोथळी ग्रामपंचायत निवडणूकीत ११ जागा आहेत. त्या पैकी खडसे परिवाराच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत.ॲड.रोहिणी खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी सहा उमेदवार खडसे यांना माननाऱ्या गटाचे असल्याचा दावा केला आहे. गेल्या वेळी ‘कोथळी’ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा संरपंच होता, यावेळी खडसे यांच्या परिवाराच्या पॅनलचा सरपंच असेल असा दावा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image