अमळनेर तालुक्यातील ४६ गावांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडीच कोटी अनुदान 

अमळनेर तालुक्यातील ४६ गावांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडीच कोटी अनुदान 

अमळनेर  : तालुक्यात फेब्रुवारी ते मे २०२० या कालावधीत अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत वितरित झाली असून त्याअनुषंगाने अमळनेर तालुक्यातील ४६ गावांच्या शेतकऱ्यांसाठी २ कोटी ५० लाख ८९ हजार २५५ रुपये इतके अनुदान अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित झाले असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली. 

सदर मदत मिळण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला होता. सदर मदत वितरित केल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. 

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार

दरम्यान त्यावेळी २०२० मध्ये अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शासन आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे होऊन आर्थिक मदत प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झाला होता. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यासाठी ३७ कोटी ५१ लाख २५ हजार एवढा निधीं अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित झाला असून अमळनेर तालुक्यासाठी आमदार अनिल पाटलांनी स्वतंत्र पाठपुरावा केल्याने तालुक्यातील ४६ गावातील शेतकऱ्यांसाठी सुमारे अडीच कोटींच्या वर अनुदान प्राप्त झाले आहे. सदर मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. 

या गावांना मिळणार मदत : 

अमळनेरसह देवगाव, देवळी, गडखांब, कुर्हे बु, कुर्हे खु, कुर्हे सीम, खेडी खु प्र अ, टाकरखेडा, आनोरे, आर्डी, अटाळे, खडके, निर्सर्डी, पिंपळे बु, पिंपळे खु, चिमनपुरी, वाघोदे, जवखेडा, आंचलवाडी, शिरसाळे बु, शिरसाळे खु, लोंढवे, मंगरूळ, शिरूड, चाकवे, खोकरपाट, बहादरवाडी, सुंदरपट्टी, गलवाडे बु, गलवाडे खु, ढेकू सीम, ढेकूचारम, अंबासन, पातोंडा, सोनखेडी, निमझरी, मांजर्डी नगाव खु, नगाव बु, धुपी, कचरे, दहिवद खु, दहिवद बु, कंडारी, म्हसले आदी ४६ गावातील ३ हजार १४३ शेतकऱ्यांना १८५३.२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने प्रतिहेक्टर १८ हजार रुपये प्रमाणे हे अनुदान मिळणार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com