Jalgaon News : पालिकेतर्फे विकसित होणार हरितपट्टे; अमळनेरला योजना

Various types of plants planted by the municipality on the road side.
Various types of plants planted by the municipality on the road side.esakal

अमळनेर (जि. जळगाव) : शहरात भौतिक विकासासह पर्यावरण संतुलित रहावे आणि वाढते तापमान नियंत्रित राहावे, यासाठी नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेत हरित पट्टे विकसित करणे सुरू केले आहे.

काँक्रिट आणि डांबरी रस्ते यामुळे तापमानात वाढ होते. त्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होतात. तसेच वाढत्या वस्तीमुळे बांधकामे होत आहेत. परिणामी वृक्षतोड देखील होत आहे. पर्यावरण असंतुलित होत आहे.

वृक्षलागवडीच्या अनेक योजना दरवर्षी अंमलात येतात. मात्र रोपे लावली की त्याची निगा राखली जात नाही, संरक्षण मिळत नाही, तसेच जनावरे झाडे खाऊन टाकतात, म्हणून वृक्ष लागवडीचे उपक्रम यशस्वी होत नाहीत.

म्हणून नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेत शहराबाहेर नगरपरिषद हद्दीत धुळे रोड, चोपडा रोड आणि टाकरखेडा रस्त्यांवर १५०० झाडे लावली आहेत. (Green belts tree plantation to be developed Scheme by municipality of Amalner Jalgaon)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Various types of plants planted by the municipality on the road side.
Onion Crisis: शेतीतून काहीच मिळणार नसेल, तर मरणाची तरी परवानगी द्या; कांदा उत्पादकांचे राष्ट्रपतींना साकडे

झाडांना दिले नंबर

नगरपरिषदेने १५ ते २० लाख रुपये निधी खर्च करून पाच ते सहा फुटाची एकूण १५०० झाडे लावली असून ठेकेदाराला तीन वर्षांपर्यंत ती जगविण्याची जबाबदारी दिली आहे. झाडांना जनावरे तसेच वारा वादळापासून संरक्षण म्हणून जाळ्या लावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर नंबर टाकण्यात आले आहे. दररोज तिन्ही रस्त्यावर तसेच नदीकाठी झाडांना नियमित पाणी टाकले जाते.

"नंबर टाकल्यामुळे खरोखर किती झाडे लावली, हे आपोआप कळते. आणि एखादे झाड मोडले, जळाले हे नंबरवरून शोधणे सोपे जाते. ते पुन्हा लावण्याची आणि जगविण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे." -प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, अमळनेर

Various types of plants planted by the municipality on the road side.
Ashram School : 20 वर्षांपासून इमारती अभावी भरतेय आश्रमशाळा! शाळा स्थलांतरित केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com