Jalgaon Corona Update : रुग्णवाढ जोमात, ऑक्सिजन प्लांट कोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen
जळगाव : रुग्णवाढ जोमात, ऑक्सिजन प्लांट कोमात

जळगाव : रुग्णवाढ जोमात, ऑक्सिजन प्लांट कोमात

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोना (Corona)रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. असे असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant)मंजूर असूनही सुरू झालेला नसल्याची बाब शिवसेना (Shiv Sena)नेते आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्लांटविषयीची माहिती आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्राद्वारे मागितली आहे.

हेही वाचा: जळगाव : तीस टक्के मालमत्ताधारकांना आकारणी अमान्य

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाटील यांनी कोविडच्या अनुपालन अहवालावर आक्षेप घेतला होता. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक फटाके फुटले होते. त्यानंतर आता आमदार पाटील यांनी आपला मोर्चा जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांटकडे वळविला आहे. सोमवारी (ता. १७) आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेत जिल्ह्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले असूनही आज रोजी एकही प्लांट सुरु झालेला नाही. कोरोनाची स्थिती अशीच वाढत राहिल्यास जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. करोना काळात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत किती व कोणकोणत्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे , एकूण किती निधी खर्च करण्यात आला आहे आदींची सविस्तर माहिती मागितली आहे.

Web Title: Growth In Corona Patient Oxygen Shortage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top