Gulabrao Patil Statement : आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जातंय

Gulabrao Patil on Uddhav Thackeray
Gulabrao Patil on Uddhav Thackerayesakal

धानोरा : आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांनी काही बुद्धीहीन लोकांना सोडून आम्हाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. आम्ही कुटुंबशाहीचे राजकारण करीत नसून आम्हाला जनतेचे राजे व्हायचे असल्याने आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी संधान साधले.

धानोरा (ता.चोपडा) येथे सोमवारी (ता.३१) १५.९० कोटी (अक्षरी रक्कम पंधरा कोटी नव्वद लाख रुपये) या पेयजल योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार लताताई सोनवणे व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Gulabrao Patil Controversial Statement Against Uddhav Thackeray Jalgaon Political News)

Gulabrao Patil on Uddhav Thackeray
Jalgaon: वाढत्या गुन्हेगारीने तांबापुराचा ता(ण) पुरा बिघडला; गुन्हेगारांवरील वचक संपला

मंत्री श्री पाटील म्हणाले, मला पाणीवाला बाबा व्हायचं असून महाराष्ट्रातील जनतेची तहान भागवायची आहे. राजकारण हे फक्त गटार, वॉटर व मीटर वर चालते. हे सरकार रिक्षावाले, टपरीवाले सर्वसामान्यांचे सरकार असून आम्ही गद्दार नसून आम्ही शिवसेना मोठी केली व तुम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरच मोठे झाले असल्याचा खोचक टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लावला.

माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आमदारांसहीत विद्यमान मंत्रीनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. गुलाबराव पाटील यांना पुन्हा पाणीपुरवठा मंत्री पद मिळाल्याने चोपडा तालुक्यात १.८८ कोटी रुपयांच्या पेयजल योजनेला मंजुरी मिळवून घेतली.

Gulabrao Patil on Uddhav Thackeray
पुणे-औरंगाबाद Corridorचा विस्तार जळगावपर्यंत वाढवा; केंद्रीय मंत्रालयाकडे प्रस्ताव

धानोरा येथे मागील काळात पाणीपुरवठा योजना फक्त कागदावर ठेवून काहींनी जनतेशी गोड गोड बोलून त्यांना बाटलीत बंद केल्याचे सांगत थेट माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांना टोला लगावला.

धानोऱ्यात पेयजल योजनेचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणार असून लवकरच २५ कोटी रुपयांचे १३२ केव्हीचे सबस्टेशनचे काम देखील मार्गी लावण्यासाठी त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विनंती केली. पुढील पंचवार्षिक निवडणुकीत देखील विद्यमान आमदार लता सोनवणे ह्यांचीच उमेदवारी राहणार असल्याचे सांगितले.

Gulabrao Patil on Uddhav Thackeray
Jalgaon Political Update : राजकीय वाद सोडा.. विकासाचे काय ते बघा आता..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com