Gulabrao Patil : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पाळधी येथे उभारणार उपबाजार : पालकमंत्री पाटील

gulabrao patil
gulabrao patilesakal

Jalgaon News : शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी आणि बाजार जवळ येण्यासाठी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाळधी येथे उपबाजार सुरू करण्यासाठी अभिवचन देत आहे. (gulabrao Patil statement about Sub market to be set up at Paladhi for convenience of farmers jalgaon news)

शेतकरीहित केंद्रबिंदू मानून धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कपबशी निशाणी लक्षात ठेवून सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलतर्फे बांभोरी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील होते. आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपचे पी.सी.आबा पाटील, भाजप ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष संजय माळी,

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

gulabrao patil
Gulabrao Patil : बाळासाहेब वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, देशाची प्रॉपर्टी : पालकमंत्री पाटील

माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहरप्रमुख विलास महाजन, कनिय्या रायपूरकर, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, प्रतापराव पाटील, उमेदवार सुनील पवार, प्रेमराज पाटील, ईश्वर पाटील, संजय पवार, जिजाबराव पाटील, संजय माळी, किरण पाटील, ज्ञानेश्वर माळी, एस. आर. पाटील, किशोर पाटील, अरविंद मराठे, सुदाम पाटील, कल्पिता पाटील, लताबाई पाटील, सुरेखा चौधरी या उमेदवारांची उपस्थिती होती.

पद्मालय येथे प्रचार

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे प्रचाराचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय येथे सुरू करण्यात आला. उपजिल्हाप्रमुख पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

gulabrao patil
Gulabrao Patil : शिरसोलीत वीज उपकेंद्राला लवकरच मंजुरी; पालकमंत्री पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com