Gulabrao Patil | सुरेशदादांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil & Suresh jain
Gulabrao Patil & Suresh jainesakal

जळगाव : सुरेशदादा जैन आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचेच बोट धरून आपण राजकारणात आलो, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. गुरुवारी (ता. १५) पालकमंत्री पाटील यांनी सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. (Gulabrao Patil statement about suresh dada jain jalgaon news)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Gulabrao Patil & Suresh jain
Nashik News : सुगरणीच्या घरट्यात ‘माळ मुनिया'ची विन; नांदुरमध्यमेश्‍वर पक्षीतिर्थातील चित्र

सुरेशदादा जैन घरकुल गैरव्यवहारात नियमित जामीन मिळाल्यानंतर ते जळगावात आले आहेत. गुरुवारी त्यांना भेटण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी झाली होती. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी जैन यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे आशीर्वाद घेतले.

पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की सुरेशदादा जैन आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे बोट धरूनच आपण राजकारणात आलो. बऱ्याच दिवसांनी ते जळगावात आले. त्यांची भेट आपल्याला घेता आली. वडिलकीच्या नात्याने राजकारणात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. मला त्यांच दर्शन घेता आले. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पालकमंत्री म्हणून आपण त्यांचे जळगाव शहरात स्वागत करतो. आजपर्यंत त्यांनी जनतेला वेळ दिला आहे. आता ते आपल्या कुटुंबाला वेळ देणार आहेत.

हे करीत असताना, त्यांनी आमच्याकडेही लक्ष द्यावे आणि आमच्या काही चुका होत असतील, तर त्याही सांगाव्यात. शहराच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, अशीच आमची अपेक्षा आहे. दादा मुंबईत होते, तरी त्यांचे लक्ष जळगावात होते. ‘पक्षी फिरे आकाशी, त्याचे लक्ष पिलापाशी’, अशी अवस्था त्यांची होती. राजकारणाच्या मैदानात त्यांनी उतरावे, अशी आपलीही इच्छा आहे. मात्र, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.

Gulabrao Patil & Suresh jain
Nashik ZP News : अनुकंपावरील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी; 118 उमेदवार प्रतीक्षेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com