Gulabrao Patil: संजय राऊत यांनी स्वतःचे कपडे सांभाळावेत : गुलाबराव पाटील

gulabrao patil
gulabrao patilesakal

Gulabrao Patil : ज्यांचे स्वतःचे कपडे ठिकाणावर नाही त्यांनी ते सांभाळावेत, असा सणसणीत पलटवार शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. (Gulabrao Patil statement against Sanjay Raut should take care of his own clothes jalgaon political)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माझ्या नादी लागू नका, अन्यथा मी शासनाचे कपडे फाडण्यास कमी करणार नाही, असा इशारा राज्य शासनाला दिला आहे.

त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की संजय राऊत यांनी आपले स्वतःचे कपडे सांभाळावे. कारण त्यांचेच कपडे आज ठिकाणावर दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या कपड्याकडे लक्ष देऊ नये.

जळगाव येथे स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या नातेवाइकांचा सत्कार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gulabrao patil
Sanjay Raut News : 'सनी देओल यांच्या बंगला २४ तासांत वाचवला, पण नितीन देसाई...'; राऊतांचा गंभीर आरोप

त्या वेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी राज्यात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले आहे.

त्याबाबत बोलताना ते म्हणाले, की सर्व पालिका, महापालिका, तसेच जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दररोज पाणी देण्यात येत आहे, त्या ठिकाणी एक दिवसाआड करा आणि ज्या ठिकाणी एक दिवसाआड पाणी देण्यात येत आहे.

त्या ठिकाणी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा. ज्या ठिकाणी टँकरची आवश्‍यकता आहे, त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

gulabrao patil
Sanjay Raut Video : 'असा' असेल इंडिया आघाडीचा लोगो; संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com