Gulabrao Patil : माझ्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन : गुलाबराव पाटील | Gulabrao Patil statement will resign if corruption charges against me proved jalgaon political news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gulabrao patil

Gulabrao Patil : माझ्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil : कोरोनाकाळात आपण चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे, त्यांनी आपल्यावरील आरोपाची चौकशी करावी.

जर तो सिद्ध झाला तर मी एका मिनिटात राजीनामा देईन अन्यथा संजय राऊत यांनी खासदारकी सोडावी, असे आव्हान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. (Gulabrao Patil statement will resign if corruption charges against me proved jalgaon political news)

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की संजय राऊत हे नेहमी बेताल वक्तव्य करीत असतात. ते काहीही बोलत असतात. त्यांनी चौकटीत राहून बोलण्याची गरज आहे.

त्यांनी आता आपल्यावर कोरोनाकाळात चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत हे खासदार आहेत, त्यांनी जळगाव येथील तीन दिवस ठिय्या मारून स्वतः चौकशी करावी. कोरोनाकाळात पूर्ण १२१ कोटी रुपयाला मान्यता मिळाली आणि चारशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ते आरोप करीत आहेत.

अत्यंत चुकीचा ते आरोप करीत आहेत. त्या वेळी मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे होते, तर आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. राऊत यांनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी. संजय राऊत यांनी त्याची चौकशी करावी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जर एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला सिद्ध झाले तर आपण एक मिनिटात मंत्री व आमदारपदाचा राजीनामा देऊ; परंतु जर तो सिद्ध झाला नाही तर खासदार राऊत यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

आमच्या तुकड्यावर राऊत मोठे झाले

संजय राऊत आमच्या तुकड्यावर मोठे झाले आहेत, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले, की माझ्यावर आरोप करणारे संजय राऊत हे काही साधूसंत नाहीत. ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारागृहात गेले आहेत.

ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. राऊत कुणाचे तरी ऐकून आपल्यावर आरोप करीत आहेत. ज्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली त्यांच्याकडून त्यांनी व्यवस्थित माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.