Latest Marathi News | धरणगावजवळ 23 लाखांचा गुटखा पकडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dharangaon: Gutkha smuggling suspect along with Divisional Police Officer Rishikesh Rawale, Police Inspector Rahul Khatal etc

Jalgaon News : धरणगावजवळ 23 लाखांचा गुटखा पकडला

धरणगाव : रोटवद गावाजवळ चोपडा विभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या पथकाने साधारण २३ लाखांचा गुटखा पकडला आहे. गुटखा भरलेला आयशर ट्रक एरंडोलकडून चोपड्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

चोपडा विभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले यांना गोपनीय माहिती मिळाली होती, की आयशर गाडी भरून मोठ्या प्रमाणात केसरयुक्त विमल पान मसाला अर्थात विमल गुटख्याची तस्करी होणार आहे.

त्यानुसार श्री. रावले यांनी आपल्या पथकासह सापळा रचत रोटवद गावाजवळ शुक्रवारी (ता. २३) पहाटे एकच्या सुमारास आयशर ट्रक अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यात तब्बल २३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा गुटखा मिळून आला. (Gutkha worth 23 lakhs was caught near Dharangaon Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Jalgaon News : अडीच लाखांच्या गांजासह एकास अटक; दुसरा पसार

तर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राधेशाम संजय रघुवंशी (रा.पिंपळकोठा) असे सांगितले. तसेच गाडी मालक मनीष सैनी (रा. एरंडोल) असल्याची माहिती दिली. दरम्यान, या दोघांविरुद्ध पोलिस कर्मचारी चंदुलाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील तपास करीत आहेत.

चोपडा विभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पोलिस कर्मचारी राहुल खताळ आणि चंदुलाल सोनवणे, रवी पाटील, नाना ठाकरे, प्रवीण पाटील, संदीप पाटील, श्‍याम भिल, करीम सय्यद, मिलिंद सोनार, मिलिंद संदानशिव यांनी केली. पोलिसांनी २३ लाख ५४ हजाराचा गुटखा आणि ८ लाखाचे वाहन असा एकूण ३१ लाख ५४ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, अटकेतील संशयित रघुवंशी याला धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांनी पोिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे गाडी तथा गुटखा मालक मनीष सैनी याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Grampanchyat Election : तीन हजार लिंबू चिरडून विजयी उमेदवार गावात; अंधश्रद्धेला खतपाणी