Hanuman Jayanti 2023 : लोण्याच्या मूर्तीचे तीर्थक्षेत्र अवचित हनुमान!

Idol in Srikshetra Avachit Hanuman Temple.
Idol in Srikshetra Avachit Hanuman Temple. esakal

जळगाव : रिधूर (ता. जळगाव) येथील तापी नदीकाठावर असलेले अवचित हनुमानाचे (Hanuman Jayanti 2023) पुरातन मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते.

भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारलेली हनुमानाची आठ फुटाची मूर्ती संपूर्ण विश्वात येथेच पाहण्यास मिळेल. विशेष म्हणजे उन्हाळ्यातही मूर्तीवरील लोणी वितळत नाही. (hanuman jayanti 2023 Avachit Hanuman shrine of idol made from butter pachore jalgaon news)

तेथे गुरुवारी (ता. ६) हनुमान जन्मोत्सव होणार आहे. गुरुवारी पहाटे पाचला हनुमानाच्या मूर्तीला ‘चोला’ चढविला जाईल. त्यानंतर दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात.

मंदिराचा जीर्णोद्धार

१९८६ मध्ये कोळगाव (जि. नगर) येथून आलेले डिगंबर आखाड्याचे महंत श्री स्वामी माधवदास महाराजांचे ‘अवचित हनुमान’ मंदिराच्या कायापालटात मोठे योगदान आहे. महंत श्री माधवदास यांच्या प्रयत्नांनी ते पुन्हा नावारूपास आले. आपल्या बालपणापासून महंत माधवदास यांचे शिष्य महंत दीपकदास महाराज या तीर्थक्षेत्राची देखभाल तीन वर्षांपासून करीत आहेत.

अशी आहे आख्यायिका

अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. त्याखाली आजूबाजूच्या परिसरातील गुराखी जनावरे चारण्यासाठी येत आणि झाडाखाली थोडी विश्रांती घेत असतं. एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Idol in Srikshetra Avachit Hanuman Temple.
Jalgaon News : कोमात गेलेल्या विद्यार्थ्यासाठी सरसावली शाळा; मदत फेरीतून 10 हजारांचे सहाय्य!

जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला. जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकऱ्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम केले. मात्र, गावातील मोठ्या जमिनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला.

मात्र, काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढून तिची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रकटलेल्या हनुमानाला तेव्हापासून ‘अवचित हनुमान’ असे संबोधले जाऊ लागले.

लोण्याचा मारोती

गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. त्यांनी दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे अवचित हनुमानाला साकडे घातले. यानंतर हनुमानाचा चमत्कार म्हणावा, की काय त्यांच्या म्हशीने दुसऱ्याच दिवशी दूध दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाले.

Idol in Srikshetra Avachit Hanuman Temple.
Nashik News: हनुमानाच्या 35 प्राचीन मूर्ती दुर्लक्षित! गोदाघाटावरील ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर

मात्र, येताना त्यांना अंधार झाल्याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाइकांकडे मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते, त्यांच्या घराला अचानक आग लागली.

आगीत सर्व खाक झाले, पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशास तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. मारोतीच्या मूर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते. मूर्ती लोण्याची असली, तर त्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नाही.

Idol in Srikshetra Avachit Hanuman Temple.
Hanuman Jayanti 2023 : प्रसिद्ध देवळांचे नगर नगरदेवळा; सतराव्या शतकापासूनची सर्वाधिक हनुमान मंदिरे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com