Jalgaon: हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले, तापीत ५० हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठच्या गावांना इशारा

Hatnur Dam Opens 22 Gates Amid Rising Inflow: हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडून तापी नदीत ५० हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Jalgaon

Jalgaon

esakal

Updated on

जळगाव: शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात विशेषतः हतनूर मोठ्या प्रकल्प पाणलोट क्षेत्रात तब्बल २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तापी आणि पूर्णा नदी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनुर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढ झाली. यामुळे हतनूर प्रकल्पाचे २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com